Posts

Showing posts from February, 2019

मांढरदेवी सायकल राईड

Image
          माझ्या साप्ताहीक सुट्टीचा वार आहे फक्त रविवार त्यामुळे शनिवारच्या दिवशी ज्या काही पब्लिक राईड आयोजित केल्या जातात त्यात मला सहभागी होण्याची कितीही ईच्छा असली तरी सहभागी होता येत नाही आणि कामाला दांडी मारुन सायकल चालवायला जाण्याएवढी माझी हौस दांडगी नाही आहे . माझ्या माहीतीतले जेवढे सायकल ग्रुप आहेत ते आपापल्या सोईनुसार आणि सुट्टीनुसार पब्लिक राईड आयोजित करतात त्यात प्रामुख्याने दुसरा आणि चौथा शनिवार निवडलेला असतो . अशा राईडला जाणे मला जमत नाही . मग मी पण माझ्या सोईनुसार आणि वेळेनुसार राईडला जातो . माझे चंचल मन जिकडे चल म्हणेल तिकडे जातो . पांडुरंगाच्या कृपेने पुणे येथील कोणतीही राईड माझ्यासाठी असाध्य राहीलेली नाही . सिंहगड असो वा लवासा . भोरघाट असो की खंबाटकी कुठेही चला आणि पसरणीसुद्धा मी कित्येकदा सायकलवर पार केलेला आहे . राईड जेवढी अवघड , मजाही तेवढीच जास्त येते . अशीच एक माझी राहुन गेलेली मजेशीर राईड म्हणजे ...