Posts

Showing posts from December, 2020

माझे एवरेस्टींग

Image
 माझे एवरेस्टींग  माऊंट एवरेस्टची समुद्रसपाटीपासुनची ऊंची जवळजवळ 8848(+1) मीटर आहे. कोणत्याही ठिकाणी सायकल चालवुन एवरेस्ट एवढी उंची गाठणे म्हणजेच एवरेस्टींग होय. एवरेस्टींग म्हणजे एवरेस्टवर जाणे नव्हे. कोणताही एखादा चढ निवडावा, छोटा असो वा मोठा, तो बर्याच वेळा वर-खाली केल्यानंतर एवरेस्ट एवढी उंची आली कि एवरेस्टींग झाले असे समजावे. या उंचीला एवरेस्टींगचा दर्जा मिळण्यासाठी या राईडची लिंक (फक्त स्ट्रावा) एवरेस्टींग टिमला पाठवावी लागते. त्यांची संमती मिळाली कि आपले नाव एवरेस्टींगच्या वेबसाईटवर "हॉल ऑफ फेम" मध्ये कायमस्वरूपी नोंदवले जाते. एवरेस्टींग हाफ (4424मी) आणि फूल (8848मी) असे दोन प्रकारे करता येते. एवरेस्टींगचे वैशिष्टय म्हणजे यासाठी कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नसते (सध्यातरी). कसलीही प्रवेश फि नाही, विमानप्रवास नाही, ना कसला हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च त्यामुळे यासाठी पैशाची आवश्यकता नसून फक्त कतृत्वाची गरज आहे. ज्या सायकलपटूंना आर्थिक परीस्थिती अभावी आपले कर्तब दाखवता येत नाही त्यांच्यासाठी एवरेस्टींग हि सुवर्णसंधी आहे. नेहमी प्रवेश फि आणि ईतर खर्चाबद्दल तक्र...

पुणे गोवा पुणे सायकल मोहीम

Image
  पुणे गोवा पुणे सायकल मोहीम पुणे गोवा पुणे सायकल मोहीम यावर्षी दिवाळी झाली की गोवा सायकल मोहीम करायचीच असे मनोमन ठरवलेले होते. कोरोना महामारीच्या कचाटयातुन कशीबशी हळूहळू सूटका होत चाललेली होती. त्यामुळे प्रवासासाठी सूट मिळालेली होती, हॉटेल्स वगैरे व्यवस्थित सुरु झालेली होती. माझ्यासाठी एवढे पुरेसे होते. सायकल चालवताना रस्त्यात तहान लागल्यावर पाणी आणि भूक लागल्यावर अन्न मिळाले कि सायकलचा प्रवास सुखकर होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा गोव्याला जाणार होतो आणि तेही सायकलवर. आणि परतीचा प्रवास सुद्धा सायकलवरच करणार होतो. तेवढंच थोडं जगावेगळं. मला जगावेगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि सगळं जग जे करते त्यापासुन मी लांब राहतो. कदाचित याच कारणामुळे मी एवढे दिवस गोव्याला गेलेलो नाही. कधीतरी व्हिस्की पितो पण बीचवरील दृश्य बघण्यात मला कसलाही रस नाही. वातानुकूलित वाहनामध्ये प्रवास करण्याची मला अ‍ॅलर्जी आहे. एसी लावलेल्या कारमध्ये प्रवास केला कि मी आजारी पडलोच म्हणून समजा, असे ब-याचदा झालेले आहे. सायकल चालवताना मिळणारी स्वच्छ, मोकळी आणि ऑक्सीजनने परीपूर्ण असलेली हवा मला फार आवडते. बरेचजण गोव्याला साय...