Posts

Showing posts from December, 2016

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-१

Image
बीआरएम ६००       पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर मी अघाशासारखा सर्वांच्या पुढे गेलो नाही. "ब्रेवे जब ६०० की हो... तो तेज सायकल चलाने का कोई मतलब नहीं होता..." सहज आणि सुलभपणे जो वेग मिळेल त्या वेगात मी सायकल चालवत होतो. मला सुरुवातीपासुनच शरीरावर ताण घेण्याची आणि हृदयाची धडधड वाढवण्याची बिल्कुल ईच्छा नव्हती. तर भेटणारा प्रत्येकजण म्हणायचा "आज काय झाले? एवढा हळू का चाललाय?" आणि जोरात गेलो असतो तर हेच म्हणाले असते ८७ नंबर जोरात सुटलाय वगैरे. प्रत्येक ब्रेवेमध्ये मी जो आराखडा बनवतो त्याचेच कटाक्षाने पालन करतो. कोण काय म्हणेल याचा मी कधीही विचार करत नाही आणि करुही नये. आणि ईतर रायडर्स जे बोलतात ती त्यांची सहज प्रतिक्रीया असते, त्यात कोणाचाही ईतर काहीही उद्देश नसतो. पाषाणवरुन चांदणी चौकाकडे जाताना काही रनर्स उलट्या दिशेने धावत येत होते आणि त्यातल्या एकानेही रीफ्लेक्टीव घातलेले नवह्ते. खाली बघत सायकल चालवत जात असताना मी तर एकाला उडवलाच असता पण नशीब मी समोर पाहीले म्हणुन अनर्थ टळला नाहीतर माझी ६०० ची ब्रेवे ईथेच संपली असती. हे रनर्स उलट्या दिशेने का पळत येतात कोणास ठाऊक? ...

माझी पहीली हाफ मॅरेथॉन

Image
माझी पहीली हाफ मॅरेथॉन        ब्रेवे (बीआरएम) करताना मी कधीही पळ काढलेला नाही पण ब्रेवे करता करता मला पळण्याची सवय अवश्य लागली. ब्रेवे करणारे बरेचसे मित्र धावण्यातही अग्रेसर आहेत. त्यांच्याच संगतीचा परीणाम दुसरे काय. सायकलिंगसाठी लागणाऱ्या पायाच्या स्नायुंना थोडा वेगळा व्यायाम मिळावा म्हणून मी कधीतरी ५ किमी धावण्याचा सराव करतो आणि तेही ६०० सारखी मोठी ब्रेवेट जवळपास आलेली असेल तर.  यावर्षी तर मी कहरच केला ५ किमी धावता धावता १० किमी दोन वेळा पळालो. पहील्यांदा धावलो तेव्हा ३ दिवस पाय खुप दुखत होते. दुस-यांदा १० किमी धावलो तेव्हा मात्र काहीच त्रास जाणवला नाही.  आणि इथेच सगळा घोळ झाला तो असा की या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे मला २१ किमी धावण्याची दुर्बुद्धी सुचली. हो दुर्बुद्धीच. त्यात भर म्हणजे टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना रोटरी क्लबच्या रनॅथॉनमध्ये भाग घ्यायचा असेल तर प्रवेश फीसुद्धा भरण्याची गरज नव्हती. टाटा मोटर्सही या स्पर्धेचे एक प्रायोजक आहेत. फुकट ते चांगलेच. मग काय मागचा पुढचा विचार न करता अर्ध्या मॅरेथॉनला (रनॅथॉन) नाव नोंदणी केली. नाव दिले की काम...

महापौर चषक सायकल स्पर्धा, ठाणे

Image
रोडबाईक्सचा रणसंग्राम दादोजी कोंडदेव स्टेडीयम, ठाणे महापौर चषक सायकल स्पर्धा, ठाणे (कला-क्रिडा महोत्सव ठाणे महानगरपालिका)      ठाणे महापौर सायकल स्पर्धेची मला जेव्हा माहीती मिळाली तेव्हा ४० वर्षावरील पुरूषांची ही सायकल स्पर्धा हायब्रीड सायकलवर घेतली जाईल असे वेबसाईटवर दिसत होते. माझ्याकडे ट्रेकची हायब्रीड सायकल असल्यामुळे मी या रेसमध्ये भाग घ्यायचे ठरवले. परंतु जेव्हा स्पर्धा जवळ आली तेव्हा आयोजकांनी हायब्रीड श्रेणी रद्द करून कोणतीही सायकल वापरता येईल असे सांगितले. कोणतीही सायकल म्हणजे त्यात रोडबाईक आलीच. रोडबाईकच्या वेगाशी हायब्रीडचा वेग स्पर्धा करू शकत नाही याची मला पूर्ण कल्पना असुनही मी माघार घ्यायची नाही असे ठरवले. मला सायकल रेसमध्ये सायकल चालवण्याचा अनुभव घ्यायचा होता. आणि यातील सहभागामुळे मला व्यवसायिक सायकलपटुंचे सायकल चालवणे आणि त्यांच्या सायकल्स पहायला मिळणार होत्या. दुसरे म्हणजे सहभागी होण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नव्हती आणि बाहेरगावावरून येणाऱ्या खेळाडुंसाठी जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था केलेली होती. अजुन काय हवंय मग? मला फक्त पेट्रोलचा खर्च य...