Posts

Showing posts from October, 2014

मी Randonneur झालो.

Image
मी Randonneur झालो... हे वाचल्या वाचल्या तुम्हाला प्रश्न पडेल की ही Randonneur (रान्दोनिअर) काय भानगड आहे?ती भानगड Brevet Randonneurs Mondiaux (BRM) अशी आहे. आणि ही BRM ची भानगड AUDAX CLUB PARISIEN FRANCE देशाशी संबंधीत आहे. सायकलींग आणि फ्रान्स देश म्हटलं की आपल्या समोर येतं ते Tour de France. आपल्या ईथे जशी कुस्तीची परंपरा तशी तिथली सायकलिंगची.  AUDAX INDIA RANDONNEURS (AIR) हा भारतातील क्लब CLUB OF PARISIEN बरोबर संलग्न आहे. भारतात आयोजित होणा-या सर्व BRM ची माहीती फ्रान्सपर्यंत पोचवली जाते. भारतातील प्रमुख शहरांमधील BRM आयोजित करणारे सर्व क्लब AIR मध्ये संलग्न आहेत. आणि या सर्व गोष्टी होण्यास कारणीभुत आहेत दिव्या ताटे. भारतातील BRM दिव्या ताटेंशिवाय होऊच शकत नाही. जे काही मी ऐकतोय आणि वाचतोय त्यानुसार दिव्या ताटे या BRM साठी भारतातील सर्वेसर्वा आहेत. पुण्यामधील सर्व BRM Pune Randonneurs आयोजित करतात. अर्थातच या क्लबची सर्व देखभाल दिव्या ताटे करत आहेत. वेळापत्रक बनवण्यापासुन ते मार्ग ठरवण्यापर्यंत सर्वकाही त्याच करत होत्या, हल्ली त्यांच्या मदतीला ईतर सायकलिस्ट धावुन यायला ल...

प्रबळगड आणि कलावंतीनदुर्ग

Image
"प्रबळगड आणि कलावंतीन"           28 सप्टें ला एकदाचा कलावंतीनदुर्ग करण्याचा योग आला. याच दिवशी लाईफ सायकलची पांचगणी १०० कि. मी. ची सायकल शर्यतसुद्धा होती, पुणे व्हेंचर्सचा हरिश्चंद्रगड ट्रेकही याच दिवशी होता. कुठे जावं काही कळत नव्हतं. १०० कि. मी. ची सायकल शर्यत मला जिंकणे शक्य नव्हते त्यामुळे नुसते श्रम एव ही केवलम करण्यात काहीच अर्थ नव्हता. हरिश्चंद्रगडला आदल्या दिवशी मुक्कामी जावयाचे होते त्यापेक्षा FONA चा प्रबळगड ट्रेक सकाळी निघुन संध्याकाळी परत येण्याचा, मस्त वाटला. लगेच मनोज राणेंच्या अकाऊंटवर ५०० रूपये हस्तांतरित केले आणि विंडो सीट बुक करून ठेवली. :D            बसप्रवास निगडीपासुन सुरू होणार होता. धायरी ते निगडी कसे पोचावे? या विचारात असतानाच राणेंच्या एका ई-मेल ने एक भन्नाट कल्पना सुचवली होती. शिवाजीनगर ते तळेगांव स्टेशन लोकलने यायचे आणि तळेगांव स्टेशनला बस पकडायची. व्वा भारी एकदम, याला म्हणतात thinking out of box. मग यात माझं सायकलप्रेम ऊतु गेलं नाही तर नवलच. शिवाजीनगर पर्यंत मी सायकल घेऊन गेलो, स्टँडला सायकल लावली. ...