Posts

Showing posts with the label Panshet

धायरी ते दापेसर ५८ कि.मी. चा सायकलप्रवास

Image
"धायरी ते दापेसर सायकल मोहीम"       धायरी ते दापेसर सायकल मोहीमेची जय्यत तयारी आठवडाभर अगोदरपासुनच सुरु होती. परफेक्ट सायकल ग्रुपसाठी विशेष टिशर्ट डिजाईन करुन घेतले होते हा त्याचाच एक भाग. टि-शर्टच्या आकारापासुन ते त्याच्या रंगसंगतीपर्यंत सर्व काही पारखुन निरखुन ठरवलेले होते. आणि यासाठी राहुल कोंढाळकरांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा होता. आदल्या दिवशी संध्याकाळी नऊ वाजता सगळया सायकलपटुंना परफेक्ट जिमजवळ बोलावुन त्यांच्या त्यांच्या साईजचे टि-शर्ट आणि टोपी प्रत्येकाला देण्यात आली. सगळेजण आवर्जुन आले होते. सकाळी सहा वाजता चव्हाण बागेत जमायचे ठरवुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. नविन टि-शर्ट पाहुन सगळे उत्साहीत झालेले दिसत होते. परफेक्टचे सायकलपटु आता एकाच रंगात दिसणार होते.        मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वेळेच्या अगोदरच चव्हाण बागेत पोहोचलो. सकाळी ५ वाजुन ५० मिनिटे झालेली होती. ०५:५८ ला राहुलचा फोन आला, "आवरलं का?", "मी चव्हाण बागेत येऊन थांबलोय" हे माझे उत्तर ऐकुन त्याला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. चव्हाण बागेत ६ च्या अगोदर येणारा मी एकमे...