Posts

Showing posts from October, 2020

एवरेस्टींग आणि मी

Image
सायकल चालवताना येणारा चढ ज्याला इंग्रजीत क्लाइंब असे म्हणतात, या क्लाइंबचं आणि माझं पहील्यापासुन वाकडं आहे. आयुष्यातली पहीली दहा किमीची राईड त्या राईडमध्ये या क्लाइंबने मला अक्षरश: रडवले होते. यापेक्षा अधिक काय बोलु आणि अधिक काय लिहु. सायकलिंगच्या सुरुवातीलाच चढाने दाखवलेली अशी भिती आजतागायत माझ्या मनावर कायम आहे. चढ म्हटले कि माझ्या अंगावर अजुनही काटा येतो. एक प्रकारची धास्ती घेतलेली आहे. लांब पल्ल्याच्या खुप सार्या बीआरएम (सायकलिंग) केल्या, चांगला तीन वेळा सुपर रॅंदोनियर झालो पण चढाबरोबरचे शत्रुत्व काही संपले नाही. मी नंतर नंतर तर या चढाला शरण जायला लागलो. नको जीवाला त्रास म्हणुन मी चढ आला कि सरळ सायकलवरुन उतरुन हातात सायकल धरुन चालत जायचो, "तु शिवाजी महाराज, तुला आठ बायका" असे त्या चढाला म्हणुन नमस्कार करायचो आणि आपला गुपचुप चालत जायचो. परंतु चढावर चालल्याने बीआरएम पुर्ण करण्याच्या वेळेमध्ये कधीही वाढ झाली नाही. चढावर पायी चालुनदेखील मी बर्याचदा पहील्या तीनमध्ये असायचो कधी कधी पहीला सुद्धा. त्यामुळे हि...

रामनामाचे मिसाईल

Image
"रामनामाचे मिसाईल" (द्वारा विजय वसवे)  रामायणातील कथा अतिशय कर्णमधुर आहेत आणि त्या ऐकायला लागले कि असे वाटते त्या कधी संपुच नयेत. या मधुर कथा ऐकताना असे वाटते कि कोणीतरी कानांमध्ये अमृत सोडत आहे. कानांचे अमृतपानच जणु. कारण हरीकथा ऐकणे हेच कानांचे मुख्य काम आहे किंवा यासाठीच देवाने आपल्याला कान दिले आहेत हे पुराणांमध्ये सांगितलेले आहे.    सदरचा संवाद हा व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत आम्ही चार मित्र व्हिडीओ कॉलवरच होतो (व्हाटसअपवर चारच लोकांना घेता येते). मी त्यांना रामनामाच्या लॉंचिंगची कथा ऐकवली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे रामनामाचे लॉंचिंग काय प्रकार आहे....ऐका तर  तर झाले असे कि सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपुचा वध केल्यानंतर लाखो-हजारो वर्ष भगवंतांचा कोणताच अवतार झालेला नव्हता. त्रेतायुग सुरु झाले होते तरीही मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यप्राण्यांना सत्ययुगासारखीच कठोर तपश्चर्या करावी लागत होती. युग बदलले परंतु युगधर्म बदललेला नव्हता. मोक्षप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर असणा-या व्यक्तींचे पराकोटींचे कष्ट कमी करण्यासाठी भगव...