Posts

Showing posts with the label running

माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन २०२१

Image
स्पर्धा - माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन   अंतर - ५० किमी तारीख - १० ऑक्टोबर, २०२१ आयोजक - रनबडीज ठिकाण - माथेरान, थंड हवेचे ठिकाण प्रवेश फि - ३०००/- (फिनिशर मेडल, टि-शर्ट ई) फोटो - वेलोस्कोपच्या छायाचित्रकारांनी धावताना काढलेले फोटो हवे असतील तर ३५५/- रुपये आकारले जातात. मुफ्त फोटो - चेतन घुसानी हवामान - थंड अपेक्षित होते परंतु ऑक्टोबरची उष्णता ईथेही जाणवली. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे धावण्याच्या मार्गावर चिखल झालेला होता आणि वातावरणात उकाडा जाणवत होता. थंड हवेच्या ठिकाणी थंड हवा औषधालाही मिळाली नाही (धावताना).  प्रवास - पुणे ते खोपोली जुन्या महामार्गाने गेल्यास उत्तम. पुणे ते माथेरान थेट प्रवास करण्याची कोणतीही सार्वजनिक सुविधा नसल्यामुळे स्वत:चे वाहन घेऊन जाणे अपरीहार्य. माथेरानमध्ये स्वयंचलीत वाहनांना प्रवेशबंदी आहे त्यामुळे माथेरानपासुन अडीच किमी अंतरावर वाहन लावावे लागते. त्यासाठी मोठा वाहनतळ आहे तिथे भरभक्कम दर आकारुन वाहन लावुन घेतात (दोन दिवसाचे १२० रुपये). माथेरानमध्ये प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश फि घेतली जाते. मास्क न घातल्यास ५०० रुपये द...

माझी पहीली सब-टु हाफ मॅरेथॉन

Image
माझी पहीली सब - टु वर्ष 2017 चा अपयशी प्रयत्न        मागच्या वर्षी माझा सब-टुचा फसलेला प्रयत्न मला चांगला आठवतोय. विसरुच शकत नाही मी तो. ती होती मगरपट्ट्यातील फिकी फ्लो मॅरेथॉन 2017 . माझ्या ईच्छीत ध्येयापासुन मी फक्त 24 सेकंद दुर राहीलो होतो. 21.097 किमी अंतर पळायला मला 2 तास 23  सेकंद लागले होते की जे मी 1 तास 59 मिनिटे आणि 59 सेकंदाच्या आत पळणे अपेक्षित होते. या मॅरेथॉनसाठी मी खुप सराव केला होता पण मला यश आले नाही. माझे अपयश मी नेहमी माझ्या मेंदुवर आणि मनावर कोरुन ठेवत असतो. त्याचा उपयोग असा होतो की ते मला कायम डिवचत राहते. तुला नाही जमले, तुला नाहीच जमणार असे म्हणत राहते. त्याचे डिवचणे असह्य झाले की मी दोन्ही हाताच्या बाह्या मागे सारुन पुढे सरसावतो आणि छाती ठोकपणे त्याला सांगतो "थांब, आता तुला दाखवतोच..."       पांडुरंगाने मला एवढे श्रीमंत केले नाही की मला रनिंग आणि ट्रायथलॉनसाठी कोच घेता येईल किंवा ट्रायथलॉनला लागणारे महागडे साहीत्य सहजपणे विकत घेता येईल पण एवढा नशिबवान नक्कीच बनवले की आयर्नमॅन अंजली भालिंगे सारखी धाव...