Posts

Showing posts with the label #Energy_food_in_brevets

ड्रायफ्रूटचे लाडु

ड्रायफ्रूटचे लाडु कोणतीही गोष्ट करुन पाहत असताना मी नेहमी सिनियर सायकलपटुंचा सल्ला घेतो किंवा त्यांच्याशी चर्चा तर नक्कीच करतो जे या मार्गावर अग्रेसर आहेत आणि या क्षेत्रात ज्यांनी प्राविण्य मिळवलेले आहे. पुण्यातील एकमेव महीला चॅम्पियन सायकलपटु अंजली भालिंगे यांच्याशी मी सल्लामसलत करुन त्यांच्या एनर्जी बारविषयी माहीती मिळवली. त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतुन त्यांनी माझ्यासारख्या सामान्य सायकलपटुसाठी वेळ काढला हे माझे सौभाग्यच. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन मला एनर्जी बारविषयी खुप उपयुक्त माहीती मिळाली. त्यंनी सांगितल्यासारखा एनर्जी बार मला बनवता आला नाही परंतु त्यांनी सांगितलेल्या पदार्थांपासुन मी ड्रायफ्रुटचा लाडु हा नाविन्यपुर्ण पदार्थ बनवला. माफ करा मी नाही बनवला तो बनवला सौ. ने. सौ. ला सर्व माहीती सांगितल्यानंतर तिने बरोबर मला जसा हवा होता अगदी तसाच लाडु बनवला. डींक लाडुशी साधर्म्य असलेला ड्रायफुटचा लड्डु. हे लड्डु खाऊन मी अनेक लांब पल्ल्याच्या ब्रेवे लिलया पुर्ण केलेल्या आहेत. या लड्डु खाण्याच्या सवयीवरुन मला ब्रेवेमधील सहकारी छोटा भीम म्हणायला लागले होते.  मी फक्त दोन प्...