माझी पहीली ४०० किमी ब्रेवेट
माझी पहीली ४०० किमी ब्रेवेट या कॅलेंडर वर्षात सुपर रँदोनिअर होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे, मी कितपत यशस्वी होईल हे सांगता येणार नाही परंतु प्रामाणिक प्रयत्न करत राहणे माझ्या हातात नक्कीच आहे. नव्या मोसमाची सुरूवात तर छान झाली होती. २०० ची बीआरएम १० तासांच्या आत आरामात पुर्ण झाली. ३०० च्या बीआरएमवर शनिची वक्रदृष्टी पडुन दोन पंक्चर तसेच ट्युबचे दोन तुकडे होण्यापर्यंत मजल जाऊन मोठ्ठा DNF मिळाला. आणि मी आता ४०० च्या बीआरएम मध्ये भाग घ्यायचे ठरवले आहे. काय होणार आहे कोणास ठाऊक? पण मी लढायचे ठरवले आहे जे होईल ते होईल. पंक्चरमुळे ३०० किमीला आलेले अपयश पचवायला जड गेले. पण स्वतःचाच मुर्खपणा भोवला असल्यामुळे इतर कोणावर खापर फोडता आले नाही हे दुःख वेगळेच (हाहाहा). ३०० मध्ये झालेल्या चुका ४०० मध्ये होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागणार होती. पंक्चर या समस्येचा गांभीर्याने विचार करावा लागणार होता. ३०० च्या बीआरएम मध्ये झालेल्या चुका सुधारण्याचा एक भाग म्हणून मी सर्वप्रथम सायकलचे टायर्स बदलण्याचा निर्णय घेतला आणि टायरच्या आतमध्ये अँटी पंक्चर टेपही बसवायचे ठरवले. पण माझ्या बजेटमध्ये बसण...