Posts

Showing posts from March, 2026

कलिंगड आणि खीर बीआरएम २०० किमी (७ मार्च २०२६)

Image
नाईट बीआरएम २०० किमी कलिंगड आणि खीर बीआरएम रायडर नं ८७ (८ तास १८ मिनिटे) रायडर नंबर ८७ सक्रीय झाला...!           यापुर्वी मी पुणे रँदोनियर्सकडून ब्रेवेमध्ये राईड करताना तब्बल तीन वेळा सुपर रँदोनियर झालेलो आहे. पुणे-सातारा-कोल्हापूर या महामार्गावर अतोनात सायकल चालवलेली आहे. पण त्याला आता खूप वर्षे होऊन गेलेली आहेत. मार्च २०१७ मध्ये मी शेवटची बीआरएम २०० केलेली मला आठवते. त्यानंतर मला ट्रायथलॉनचे वेड लागले. त्या वेडातुन पुढे २०१९ मध्ये मलेशियात आयर्नमॅन (१५ तास १४ मिनिटे) झाल्यावरच माझ्या जीवाला शांती मिळाली. आयर्नमॅनमध्ये ४ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे या तिन्ही गोष्टी सलग कराव्या लागतात. आयर्नमॅन किताब मिळवल्यानंतर मला ट्रायथलॉन सुद्धा निरस वाटू लागली. व्हिडीओ गेममध्ये जसे सीपीयूला हारवायला लागल्यावर त्या गेममधील मजा निघून जाते किंवा एकच पदार्थ सतत खात राहील्यावर जशी त्याची शिसारी येते तशी माझी अवस्था होऊ लागली. मग हाफ आणि फुल मॅरेथॉनमध्ये टायमिंगचे वेड लागले जे सर्व रनर्स समाजाला लागलेले आहे. वेळेशी स्पर्धा करता करता सब-टू हाफ मॅर...