Posts

Showing posts from April, 2023

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

Image
शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख - 16 एप्रिल, 2023 रनिंगमध्ये मॅरेथॉनची वेळ सुधारण्याच्या नादात माझे सायकल चालवणे मागे पडले होते हे मला मान्य करावेच लागेल. गेली दोन वर्षे झाले पन्नास हजार किमी सायकलिंगचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एक हजार पेक्षाही कमी अंतराची आवश्यकता असताना माझ्याकडुन तोही पार झालेला नाही. जुन महीन्यातील पुणे पंढरपुर सायकलवारी झाल्यानंतर सायकल स्वच्छ करुन मस्तपैकी टांगुन ठेवुन दिली होती. यावर्षीची टाटा अल्ट्रा मॅरेथॉन पुर्ण केल्यानंतर पायांना थोडी विश्रांती द्यावी असे मी ठरवले होते. याच दरम्यान अंजलीने मला "कुंभार्लीचा राजा" या सायकल शर्यतीविषयी माहीती दिली. सह्याद्रीच्या घाटात सायकल शर्यत आयोजित केली जात आहे हे ऐकुनच मला फार आनंद झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता मी या शर्यतीसाठी नाव नोंदवले. कोकणातुन वर यायचे असेल तर सह्याद्रीत अनेक घाटरस्ते आहेत. त्यापैकी बरेच मी सायकलवर चढवलेले आहेत. मराठा रमतो तो सह्याद्रीतच. भोरघाट, ताम्हीणी घाट, वरंधा घाट, आंब...