Posts

Showing posts with the label #brm #randonneurs #pune #cycling #cyclists #audax #nh4 #pune #vijayvasve #vasve

ड्रायफ्रूटचे लाडु

ड्रायफ्रूटचे लाडु कोणतीही गोष्ट करुन पाहत असताना मी नेहमी सिनियर सायकलपटुंचा सल्ला घेतो किंवा त्यांच्याशी चर्चा तर नक्कीच करतो जे या मार्गावर अग्रेसर आहेत आणि या क्षेत्रात ज्यांनी प्राविण्य मिळवलेले आहे. पुण्यातील एकमेव महीला चॅम्पियन सायकलपटु अंजली भालिंगे यांच्याशी मी सल्लामसलत करुन त्यांच्या एनर्जी बारविषयी माहीती मिळवली. त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतुन त्यांनी माझ्यासारख्या सामान्य सायकलपटुसाठी वेळ काढला हे माझे सौभाग्यच. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन मला एनर्जी बारविषयी खुप उपयुक्त माहीती मिळाली. त्यंनी सांगितल्यासारखा एनर्जी बार मला बनवता आला नाही परंतु त्यांनी सांगितलेल्या पदार्थांपासुन मी ड्रायफ्रुटचा लाडु हा नाविन्यपुर्ण पदार्थ बनवला. माफ करा मी नाही बनवला तो बनवला सौ. ने. सौ. ला सर्व माहीती सांगितल्यानंतर तिने बरोबर मला जसा हवा होता अगदी तसाच लाडु बनवला. डींक लाडुशी साधर्म्य असलेला ड्रायफुटचा लड्डु. हे लड्डु खाऊन मी अनेक लांब पल्ल्याच्या ब्रेवे लिलया पुर्ण केलेल्या आहेत. या लड्डु खाण्याच्या सवयीवरुन मला ब्रेवेमधील सहकारी छोटा भीम म्हणायला लागले होते.  मी फक्त दोन प्...

सलग ६०० कि.मी. सायकलिंग

Image
सलग ६०० किमी सायकलिंग....  Pune Randonneurs : Date: 9th January, 2016 Start Time: 06:00 Starting Point Pune University Route Map: Deccan Naadkhula 600 km Facebook: Check out this event on Facebook Event Details on AIR site: 600 BRM 9th Jan 2016 माझे सुपर रँदोनिअर होण्याचे स्वप्न मला पुर्ण करायचे आहे आणि त्यासाठी मला ४० तासात ६०० किमी चालवणे आवश्यक आहे. या ४० तासांत सायकल चालवणे, नाष्टा, जेवण, विश्रांती, झोप आणि पंक्चर वगैरे सायकलची कामे निघाली तर तीसुद्धा या ४० तासातच उरकायची आणि ६०० किमी अंतर पार करायचे. सलग ४० तास सायकल चालवण्याचे ओझे पेलताना पंक्चर आणि ब्रेकडाउनची तलवार सतत डोक्यावर टांगलेली असते. महागडे टायर्स आणि महागड्या सायकल्स वापरण्याचे कारण म्हणजे बीआरएममध्ये ब्रेकडाउन आणि पंक्चरच्या धोक्याचे प्रमाण खुप कमी करणे होय. ९ जानेवारीला पुणे रँदोनियर्सचे ६०० किमी चे ब्रेवेट होते. नविन वर्षातील हे पहीलेच ब्रेवेट. ज्या मार्गावर ४०० किमी सायकल चालवली त्याच मार्गावर थोडे अंतर वाढवून ६०० किमी सायकल चालवायची होती. ४०० च्या बीआरएममध्ये माझी एवढी वाट लाग...

सायकलप्रवास दोन वर्षांचा झाला..

Image
सायकलप्रवास दोन वर्षांचा झाला...  ३१ डिसेंबरला केलेले संकल्प टिकत नाहीत असे म्हणतात. नव्याचे नऊ दिवस या म्हणीलासुद्धा मागे टाकणारे हे संकल्प नऊ दिवससुद्धा टिकत नाहीत. आणि ते अगदी खरेही आहे. तरीही मी या दिवशी बरोबर दोन वर्षापुर्वी सायकल चालवण्याचा संकल्प केला होता आणि आश्चर्य म्हणजे तो अजुनही टिकुन आहे.  माझ्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये एक गियर असलेली सायकल बरेच दिवस पडुन असलेली मी जाता येता पाहायचो. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या शिवाची सायकल होती ती. एकदा त्याची परवानगी घेऊन त्या सायकलवर मी पुणे कँटोन्मेंटची राईड करून आलो.  आयुष्यात पहील्यांदाच गियरची सायकल चालवली.  मला गियर कसे बदलायचे हे राहुल कोंढाळकरने शिकवले आणि त्या राईडमध्ये सायकलची पडलेली चेनही त्यानेच बसवून दिली होती.  राहुल कोंढाळकर सोबत केलेली ती छोटीशी राईड माझ्यातील उत्सुकता, आवड आणि तृष्णा जागृत करून गेली होती. स्नेल कंपनीच्या त्या सायकलवर सुरू झालेला प्रवास अजुनही अविरत चालुच आहे.  २ ते ३ महीन्याच्या कालावधीनंतर मला स्वतःची सायकल असावी असे वाटु लागले. गियरच्या सायकलबद्दल मला शुन्य ज्ञान होते. ...