Posts

Showing posts from November, 2014

सायकलवरुन किल्ले पुरंदर....

Image
           सायकलवरुन किल्ले पुरंदर....         दर दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी वेगळं, मनाला भरपुर प्रसन्नता मिळेल असं काहीतरी केल्याशिवाय मला चैन पडत नाही. दिवाळी आहे म्हणुन नुसतं नटुन थटुन घरात बसणे मला झेपत नाही, फार फार तर लक्ष्मीपुजनच्या दिवशी सौ. च्या आग्रहाखातर कुठे बाहेर पडत नाही. दिवाळीच्या लांबलचक सुट्टीचा खासा उपयोग व्हावा असं दरवेळी वाटत असतं. ५ दिवसाची असली तरीपण आमच्यासाठी लांबलचकच. अगदी नवस करून वर्षभर वाट पहावी अशी हि दिवाळीची सुट्टी.         सर्व मित्र या सुट्ट्यांचा आनंद घेत असतात आणि अशा या सणासुदीला कोणी सायकलिंगला येईल की नाही? अशीही शंका मनामध्ये होती, म्हणुन पुरंदरचा बेत कोणालाच बोलुन दाखवला नाही.  पुण्याजवळ सायकलच्या आवाक्यात असणारा पुरंदर हा दुसरा गड. अर्थात पहीला सिंहगड. सिंहगड खुप वेळा करून झालेला आहे. जाऊन येऊन ४५ कि.मी अवघे. पुरंदर जाऊन येऊन १०० कि.मी. आहे. बेत ठरला. या दिवाळीची पहाट पुरंदरच्या दिशेला जाणार होती.           सकाळी लवकरच सायकलल...