Posts

Showing posts with the label Coffee

ताजची कॉफी आणि बरंच काही

Image
  “ कथा ताजच्या कॉफीची ”           यावर्षीच्या इंटरटाटा क्रिकेट स्पर्धेसाठी माझी टाटा मोटर्स पुणेच्या मुख्य संघात निवड झाली . टाटा मोटर्स पुणेच्या मुख्य संघात खेळाण्याचे माझे खुप दिवसांचे स्वप्न यावर्षी पुर्ण झाले . खरंच यासारखा आनंद नव्हता . आता निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर होती . ट्रायथलॉनच्या सरावामुळे शारीरीक फिटनेसमध्ये झालेली सुधारणा मला क्रिकेट खेळताना खुप उपयोगी पडते . प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यात एक वेळ अशी येतेच की चेंडु कसा टाकायचा आणि बॅट कशी पकडायची याचे तंत्र जरी माहीत असले तरी शारीरीक फिटनेस अभावी कितीही ईच्छा असली तरीही क्रिकेट खेळता येत नाही . शारीरीक फिटनेस या समस्येला मी आता पुर्णविराम दिलेला आहे .             रविवारी संध्याकाळी ७ वाजुन २० मिनिटांनी डेक्कन एक्सप्रेस छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये धडक्ली आणि आम्ही १५ क्रिकेटर्स ...