Posts

Showing posts with the label #VijayVasve #BRM600 #PuneSankeshwarPune #PuneRandonneurs #Audax #NH4 #Cycle #Cycling #Sankeshwar #Kolhapur #Nippani #TawandiGhat #Satara #Khambatki #KatrajTunnel #PuneUniversity

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-२

Image
पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-२      साधारण ३०० किमी सायकल चालवल्यानंतर जेवताना घनपदार्थ लवकर घशाखाली उतरत नाहीत तरीसुद्धा त्यांना बळेच पोटात ढकलावे लागते. नाहीतर सायकल चालवण्यासाठी उर्जा कुठुन मिळणार? प्रत्येक घासाबरोबर पाण्याचा एक घोट घेतला की त्यांना घशाखाली ढकलायचे काम सोपे होते. भाताच्या एका घासाबरोबर मी एक चमचा सूप घेत होतो. सूप आणि भात खाऊन झाल्यावर मी लगेच परतीच्या तयारीला लागलो. छोट्या पंपाने दोन्ही चाकात १३० पीएसआय हवा भरुन घेतली म्हणजे कमी हवेमुळे वेग कमी व्हायला नको आणि पंक्चरची पण भिती नको. थंडीचा सामना करायचा होता त्यामुळे मी कान आणि डोके गरमच्या टोपीने मस्त झाकुन घेतले. तेवढ्यात आशिश तेथे आला आणि जाऊ या बरोबर म्हणाला. ईथुन पुढचा ३०० किमी सायकलप्रवास मी आता आशिशबरोबर करणार होतो. रात्री १० वाजुन ४५ मिनिटांनी आम्ही राजधानी हॉटेल (संकेश्वर) सोडले. संकेश्वरपासुन हायवेपर्यंतचा रस्ता एवढा खराब आहे की पुण्याच्या जवळपास उदाहरण देण्यासाठी एवढा खराब रस्ता कुठेच नाही. संकेश्वरचा फ्लायओव्हर ओलांडल्यानंतर उजवीकडे वळलो आणि सर्व्हीस रोडने महामार्गावर आलो. आता हाच मह...

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-१

Image
बीआरएम ६००       पुणे विद्यापीठ सोडल्यानंतर मी अघाशासारखा सर्वांच्या पुढे गेलो नाही. "ब्रेवे जब ६०० की हो... तो तेज सायकल चलाने का कोई मतलब नहीं होता..." सहज आणि सुलभपणे जो वेग मिळेल त्या वेगात मी सायकल चालवत होतो. मला सुरुवातीपासुनच शरीरावर ताण घेण्याची आणि हृदयाची धडधड वाढवण्याची बिल्कुल ईच्छा नव्हती. तर भेटणारा प्रत्येकजण म्हणायचा "आज काय झाले? एवढा हळू का चाललाय?" आणि जोरात गेलो असतो तर हेच म्हणाले असते ८७ नंबर जोरात सुटलाय वगैरे. प्रत्येक ब्रेवेमध्ये मी जो आराखडा बनवतो त्याचेच कटाक्षाने पालन करतो. कोण काय म्हणेल याचा मी कधीही विचार करत नाही आणि करुही नये. आणि ईतर रायडर्स जे बोलतात ती त्यांची सहज प्रतिक्रीया असते, त्यात कोणाचाही ईतर काहीही उद्देश नसतो. पाषाणवरुन चांदणी चौकाकडे जाताना काही रनर्स उलट्या दिशेने धावत येत होते आणि त्यातल्या एकानेही रीफ्लेक्टीव घातलेले नवह्ते. खाली बघत सायकल चालवत जात असताना मी तर एकाला उडवलाच असता पण नशीब मी समोर पाहीले म्हणुन अनर्थ टळला नाहीतर माझी ६०० ची ब्रेवे ईथेच संपली असती. हे रनर्स उलट्या दिशेने का पळत येतात कोणास ठाऊक? ...