Posts

Showing posts with the label Lingana

बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)

Image
बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)        लिंगाणा माझ्यासाठी नेहमीच एक आकर्षण आहे. विशेषत: जेव्हापासुन शिखर फाऊंडेशनबरोबर तो मी सर केलाय. लिंगाणाच्या माथ्यावरुन मोहरीचे पठार जेव्हा पाहीले तेव्हापासुनच तिथे जाण्याची तीव्र ईच्छा मनामध्ये होती पण जाण्याचा मार्ग नाहीत नव्हता. मढेघाटला जाताना वाचलेल्या पाटीच्या आणि दिशेच्या आधारे ही तीच मोहरी असावी अशी माझी पक्की खात्री झाली होती. गुगल मॅप्सवर शोधाशोध केल्यानंतर तिकडे जाण्यासाठी हाच मार्ग दाखवलेला होता. मागच्या वर्षी याच दिवसामध्ये तिथे जाऊन आलो. पण तेव्हासुद्धा बोराटयाच्या नाळेत उतरायचे राहुन गेले होते. बोराटयाच्या नाळेविषयी खुप ऐकलेले होते. ऐकलेली बोराटयाची नाळ तेव्हा नुसती बघुन ठेवली होती. अर्थात मी पुन्हा ईकडे येणार होतोच तिला जवळुन पाहायला. या जानेवारीतले तीन रविवार मी क्रिकेट खेळ्ण्यात वाया घालवले, उत्कृष्ट फलंदाज वगैरे ट्रॉफी मिळाली पण ट्रेकींग करण्याचे तीन रविवार गेल्याचं दु:ख जरा जास्त होतं. खरंतर बोराटयाची नाळ जानेवारी २०१४ मध्येच "Target Locked" करुन ठेवली होती. जानेवारीत क्रिकेटचा अडथळा आला नसता तर फेब्रुवा...

रायलिंग पठारावरुन दिसणारा लिंगाणा

Image
"मोहोरीच्या पठारावरुन दिसणारा लिंगाणा"        दरवर्षी उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये एकतरी किल्ला सहकुटुंब बघुन यायचा असे ठरवुन ठेवलेले आहे. या मोहीमेअंतर्गत पुण्याजवळील बहुतेक सर्व किल्ले बघुन झालेले आहेत त्यात सिंहगड, राजगड, पुरंदर, शिवनेरी, प्रतापगड, रायगड ई. किल्ले झाले आहेत. २०१३ च्या सुट्टीत कुठल्या किल्ल्यावर चढाई करावी या विचारात पडलो होतो, कारण यावर्षीचा उन्हाळा फारच भयंकर आहे ४१-४२ डिग्री सेल्सिअस तापमानात किल्ला चढणे म्हणजे खुपच कठीण काम. पण कोणता तरी किल्ला पाहायचाच असे ठरवलेले होते. कोणता किल्ला पाहता येईल? याचा विचार करत असताना लिंगाणा समोर दिसणारे रायलिंग पठार डोळयासमोर तरळले.  लिंगाणाकडे जाताना लागणारी पाबे खिंड. येथुन एकाच वेळी राजगड, तोरणा आणि सिंहगड पाहता येतो. पाबे खिंडीतुन दिसणारा किल्ले तोरणा. पाबे खिंडीतुन दिसणारा राजगड. केळदच्या अलीकडे उजव्या हाताला सिंगापुर मार्गे रायलिंग पठाराकडे. रायगड पाठमोरा घेऊन उभा असलेला लिंगाणा फोटो घेण्याची संधी कोण सोडेल? संपुर्ण रस्ता धुळीने माखलेला, रस्त्यावर एवढी धुळ म...