Posts

Showing posts from August, 2019

माझे स्विमिंग

माझे स्विमिंग मी कामगार कल्याण भवन, सहकारनगर येथे पोहण्यास जातो कारण महाराष्ट्र शासनाने अखिल कामगारांच्या कल्याणासाठी हा स्विमिंग पूल बांधलेला आहे आणि मी एक कामगार असल्यामुळे येथे जाण्यास पात्र आहे. कामगारांसाठी वार्षिक सभासदत्व (कोणत्याही आरक्षणाशिवाय) सवलतीच्या दरात उपलब्ध आहे अशी माहीती माझा मित्र प्रसाद निरगुडे याने मला दिली होती. त्याच्याकडे अशा प्रकारची सवलत वगैरे कुठे मिळते याची इत्यंभुत माहीती उपलब्ध असते. हि सवलत कामगारांचे कुटुंबीय सुद्धा घेऊ शकतात. उभ्या आयुष्यात फक्त हिच शासनाची सवलत मला उपभोगण्यास मिळाली आहे. हेही नसे थोडके. जे कामगार नाहीत ते सुद्धा या पुलचे सभासद होऊ शकतात परंतु त्यांना कोणतीही सवलत मिळत नाही. शासनाकडे हा स्विमिंग पुल चालवण्याची पुरेसी यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी हा पुल चालवण्याचे कंत्राट मीरा फॅब्रिकेटर्सला दिलेले आहे (असे प्रथमदर्शनी भासत आहे). मीरा फॅब्रिकेटर्स त्यांचे काम चोख बजावत आहे. पुलमध्ये पोहण्याची शिस्त सोडली तर इतर सर्व शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले जाते. सकाळी नऊ वाजता फक्त महीलांची बॅच असते त्यावेळेस सर्व पुरूषांना तल...

मिशन मंगल

मंगळयान      खुप दिवसांनी सौ. ला सिनेमाला घेऊन गेलो. मंगलयान या मोहिमेत महिलांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांचा मुख्य सहभाग ऐकिवात आहेच तो सौ. ला दाखवण्याची खूप इच्छा होती. ...