Posts

Showing posts from September, 2018

Deccan Triathlon 29th October 2017

Image
डेक्कन ट्रायथलॉन पार्श्वभुमी: परदेशात जाऊन आयर्नमॅन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर सराव म्हणुन आपल्या देशातील ट्रायथलॉन स्पर्धांमध्ये भाग घेत राहणे अत्यंत आवश्यक आहे असे अंजली भालिंगे यांनी सांगितल्यानंतर की ज्या मला नेहमी मार्गदर्शन करत असतात मी क्षणाचाही विलंब न करता डेक्कन ट्रायथलॉनमध्ये नाव नोंदवले. गोवा, हैद्राबाद, चेन्नई आणि दिल्लीमध्ये सर्रास या स्पर्धांचे आयोजन केले जाते. पण माझे नशिब एवढे चांगले की मी ट्रायथलॉनमध्ये भाग घ्यायचे ठरवले आणि आपल्या कोल्हापुरातच हाफ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा भरवली गेली जिचे नावही एकदम भन्नाट होते "डेक्कन ट्रायथलॉन". माझ्या अष्टपैलु व्यक्तीमत्वामध्ये आता मी ट्रायथलॉनची भर टाकणार होतो. सायकलिंगचा भक्कम पाया आणि थोडीफार रनिंगची पार्श्वभुमी या दोन गोष्टींच्या बळावर मी ट्रायथलॉनमध्ये भाग घेण्याचे ठरवले. स्प्रिंट, ऑलिम्पिक, हाफ आणि फुल असे ट्रायथलॉनचे प्रकार असतात हे मला रजिस्ट्रेशन करताना कळले. याअगोदर मी कधीही ट्रायथलॉन प्रकार केलेला नव्हता किंवा तो कशाबरोबर खातात हेसुद्धा मला माहीत नव्हते. स्प्रिंट आणि ऑलिम्पिकचे अंतर मला म्...