Posts

Showing posts with the label #LSOMPune #LSOMBopdev #PuneRunning #PuneRunners

एल्सॉमचा बोपदेव (हाफ मॅरेथॉन)

Image
एल्सॉमचा बोपदेव     मला सायक्लिंगची फार आवड आहे, पळणे हा माझा विषय नाही. पण माझे बरेचसे सायकल चालवणारे मित्र धावण्याच्या स्पर्धेतही भाग घेतात आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यातले काहीजण पोडीयम फिनिशर्सही आहेत. मुंबई मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, माथेरानची दमछाक करणारी मॅरेथॉन, दुरशेत मॅरेथॉन, स्टोनरीज व्हॅली मॅरेथॉन, पुणे एल्सॉम (LSOM= Last Sunday of the month) तसेच दिल्ली, बेंगालुरु, हैद्राबाद, लेह-लडाख ईत्यादी ठिकाणी स्पर्धा होतात हे मला सोशल मिडीयामुळे माहीत झाले. पुणे मॅरेथॉन मला शालेय जीवनापासुन माहीत होती आणि ती अजुनही अखंडीतपणे चालु आहे. पुणे मॅरेथॉनचे फुकट मिळणारे बनियन/टि-शर्ट मिळवण्यासाठी मी आणि माझा मित्र नेहरु स्टेडीयमला जाऊन नावनोंदणी करायचो पण मॅरेथॉनमध्ये पळायला कधीच गेलो नाही. तेव्हा मॅरेथॉनचा लोगो असलेल्या बनियनचे फार आकर्षण वाटायचे. याअगोदर  मॅरेथॉनशी संबंध आला तो एवढाच तेव्हा स्वप्नातही वाटले नव्हते की भविष्यात मी खरोखर  मॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी भाग घेईल. खरंतर या धावण्याच्या संसर्गाची फेसबुकवरील मित्रांच्या पोस्ट वाचुन वाचुन मला लागण झाली आणि त्य...