Posts

Showing posts from January, 2023

मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)

Image
मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २) रेल्वे प्रवास, खाणे आणि निवांत झोपणे फक्त एवढेच काम असल्यामुळे शरीरामध्ये दैनंदिन जीवनात जाणवणारा थकवा औषधालाही जाणवत नव्हता. शरीर एकदम ताजेतवाने होते. पहाटे तीनचा अलार्म असुनही मला अलार्मच्या अगोदर दोन मिनिटे जाग आली. एवढे माझे मन, बुद्धी आणि शरीर मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आतुर झालेले होते. मन थोडे साशंक वाटत होते. यावेळेस सब-फोर होईल की नाही? हा यक्षप्रश्न माझ्यासमोर ऊभा होता. शंकांचे काहुर, अनिश्चिततेचे सावट आणि सब-फोरचा निर्धार सोबत घेऊन मी हॉटेल सोडले. हॉटेल शबाना गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आणि रीगल सिनेमाला लागुनच होते. मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा सगळीकडे रनर्सच रनर्स दृष्टीस पडत होते. मी पण मॅरेथॉन धावणार्यांच्या लोंढयात सामील झालो. थोडे मंदगतीने धावत हृदयाला गतीमान करण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात "फेस स्कॅनरने" चेहर्याची ओळख पटल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. सर्व भारतातुन बरेचसे धावपटु ही मॅरेथॉन धावण्यासाठी येथे आलेले होते. काही निष्णात, काही नवखे, काही हौशी तर काही बक्षिस जिंकण्याच्या लालसेने आलेले होते.  ...

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)

Image
मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)   ग्रंथांमध्ये जशी गीता, नद्यांमध्ये जशी गंगा, गडांमध्ये जसा दुर्गदुर्गेश्वर रायगड, देवांमध्ये जसा इंद्र, पक्ष्यांमध्ये जसा गरूड, पर्वतांमध्ये जसा मेरू पर्वत, मण्यांमध्ये जसा कौस्तुभ मणी, वैष्णवांमध्ये जसा शंभू आणि अप्सरांमध्ये जशी ऊर्वशी तशी सर्व मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉन. पळण्याचे वेड लावणारी मुंबई मॅरेथॉन. हर दिल मुंबई म्हणजे मुंबई मॅरेथॉन. रनिंगची पंढरी म्हणजे मुंबई मॅरेथॉन. अशा या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्याशिवाय स्वत:ला रनर म्हणुन घेणार्या कोणत्याही व्यक्तीला सदगती प्राप्त होणे शक्य नाही. याचसाठी केला होता अट्टहास असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी मुंबई मॅरेथॉन पुनरागमन करणार होती आणि मी मात्र रनिंगपासुन फार दुर गेलेलो होतो. 17 सप्टेंबरला आमचा बहुचर्चित दुधसागर ट्रेक संपन्न झाला आणि मी 2022 सालातील नियोजीत सहली आणि ईच्छेनुसार आखलेल्या सर्व ट्रेक्समधुन मोकळा झालो. याच कालावधीत बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनची नावनोंदणी सुरु होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या चर्चेला उ...