Posts

Showing posts from April, 2013

मानवीय कालगणना

Image
"मानवीय कालगणना" उपनिषदे आणि भगवद गीतेतील प्रमाणानुसार कालगणना अशी आहे; सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि ही चार युगे एकामागुन एक चालु असतात. चार युगे पुर्ण झाली की त्याला एक चतुर्युग म्हणतात. अशी हजार चतुर्युगे झाली की ब्रम्हदेवाचा सुर्यास्त होतो (१२ तास) भगवदगीतेतील श्लोक: अध्याय ८, श्लोक १७ : सहस्त्रयुगपर्यंन्तमहर्यद्ब्रम्हणो विदु: l रात्रिं युगसहस्त्रान्तां तेहोरात्रविदो जना: ll  "मानवीय कालगणनेनुसार, एक सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रम्हदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक सहस्त्र चतुर्युगांची ब्रम्हदेवाची एक रात्र असते." हा झाला गीतेतील श्लोक, निश्चित आठवत नाही पण बहुतेक मुंडक उपनिषदामधे कालगणना दिलेली आहे...ती अशी आहे. सत्ययुग कालावधी- १७ लाख २८ हजार वर्षे त्रेता युग कालावधी- १२ लाख ९६ हजार वर्षे द्वापारयुग कालावधी- ८ लाख ६४ हजार वर्षे कलियुग कालावधी- ४ लाख ३२ हजार वर्षे. एवढी सगळी वर्षे म्हणजे एक चतुर्युग. अशी हजार चतुर्युगे म्हणजे ब्रम्हदेवाचे १२ तास.. ब्रम्हदेवाला १०० वर्षे आयुष्य आहे.. ब्रम्हदेवाच्या मृत्युनंतर दिर्घ आयुष्...

धबधबा... पावसाळ्यातला आणि मनातला !

Image
वर्गमित्रांबरोबर ब-याचदा फ़ोनवर बोलणे व्हायचे.. आपण कधी भेटत नाही, कधी कुठे ट्रिपला एकत्र जात नाही याची कायम खंत ऎकायला मिळायची. कुठेतरी भेटु या रे !! तु बोलव ना सगळ्यांना, आपण भेटु यार!. खुप दिवस झाले. मला त्याचा नंबर देऊन ठेव, मी पण बोलतो त्याच्याशी. नक्की जाउ कुठेतरी. प्रत्येकाचा फ़िक्स हाच डायलॉग. बोलता बोलता उन्हाळा सरुन गेला. पावसाळा आला, पण पाऊस... तोही आमच्या ट्रिपसारखाच.. तो कुठे आला? दैनंदिन जीवनचक्रातुन थोडासा विरंगुळा तर हवा होताच. खुप दिवस मित्रांचा झालेला विरह.. काय करायचं? काय करायचं? काहीच कळत नव्हतं. असं करता करता मीच शिवाजी व्हायचं ठरवलं. हर हर महादेव ! "मोहीम वरंधा"... ठरलं तर. मी जुन्या सवंगडयांबरोबर सहलीची स्वप्नं पाहत होतो. खुप दिवस होऊन गेले एकत्र ट्रिपला गेलेलो. तसं अधुन मधुन पार्टया वगैरे करायचो पण त्याला ट्रिपची मजा थोडी ना येते. सर्वात अगोदर बेत कोणाला सांगायचा? कमीत कमी "येतो", "बघु या" असं तरी म्हणणारा असावा. पक्याला फ़ोन लावला "YES DONE!! तु म्हणशील तिकडं जाऊ, पुढच्या रविवारी फ़िक्स. ओके.." मोहीमेला सुरुवात चा...

लिंगाणा एक थरार

Image
"लिंगाणा एक थरार" "लिंगाणा"Climbing चे साहीत्य आणि Climbers ने खचाखच भरलेल्या दोन व्हिस्टा आणि एक मांझा सुसाट निघाल्या होत्या, शनिवार, २३ मार्च २०१३ (03:30 pm). जागोजागी थांबलेले मावळे आणि त्यांची रसद गॊळा करत-करत NH-4 ने कायदेशीररीत्या तोल वगैरे भरुन (७० रुपये) भोर मार्गे वरंध्यात पोहोचलो (६:४० pm). सुर्यास्ताचे मनमोहक दृश जरी दहा मिनिटांसाठी गेले होते तरीसुद्धा सुर्याचे अंधुकसे पुर्णाकृती प्रतिबिंब पहायला मिळाले, हेही नसे थॊडके ! वरंधा घाटात भजी आणि वडापाव पोटात कोंबुन कोंबुन भरले कारण नंतर लिंगाण्याच्या गुहेत पोहोचेपर्यंत खाण्याचा योग नव्हता, त्यावर गरम गरम चहा ओतुन पुर्णविराम दिला आणि आमचा ताफा पुन्हा भरधाव निघाला. वरंध्यातुन खाली उतरल्यावर उजवीकडे बिरवाडीकडे वळालो. रायगडाला पुर्वेकडुन वळसा घालणा-या रॊडने अड्राईच्या पुढे उजवीकडे पाणे गावात आल्यावर सर्वांनी ब्रेक लावले.(०९:३० pm). राम मंदिरासमोर गाडया लावुन सर्वांनी बॅगा भरायला सुरुवात केली. गाडीतुन उतरल्या उतरल्या प्रविण कुठेतरी गायब झाला होता. पर्यटक आलेले पाहुन गावक-यांनी पाण्याचा एक...