Posts

Showing posts with the label Saptatirtha Pushkarni

हरिश्चंद्रगड ट्रेक

Image
" हरीश्चंद्रगड  पाचनेई मार्गे " साधारण माहीती विभाग- माळशेज घाट जिल्हा- अहमदनगर रांग-  हरीश्चंद्रगड समुद्रसपाटीपासुन उंची- ४६७१ फुट श्रेणी- सोपी/अवघड (तुम्ही कोणता मार्ग निवडता त्यावर अवलंबुन) कालावधी- आदल्या रात्री मुक्कामी गेलेले उत्तम            सह्याद्रीची श्रीमंती एवढी अफाट आहे की आम्हा भटक्यांना गरीबीची कधी जाणीवच होत नाही. युरोप सिंगापुरच्या कृत्रिम झगमटापेक्षा सह्याद्रीचं रांगडं रुप अनुभवण्यातच मला धन्यता वाटते. आणि सह्याद्री अनुभवायचा असेल तर ईथे पैशाची श्रीमंती कुचकामी ठरते. ईथे हवी शरीराची श्रीमंती. सह्याद्रीत जेवढी गुंतवणुक कराल तेवढी तो दामदुप्पटीने परत करतो.           ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातलं सर्वोत्तम ठिकाण कोणते असेल तर ते म्हणजे हरीश्चंद्रगड. याला महाराष्ट्रात ट्रेकर्सची पंढरी म्हणतात. सह्याद्रीत बरेच ट्रेक केलेले असोत पण हरीश्चंद्रगड केलेला नसेल तर तुमच्या ट्रेकींगला काही अर्थ उरत नाही निदान आमच्या पुण्यात तरी तसं आहे. म्हणजे १०० कसोटी सामने खेळुनही  लॉर्डसवर एकही कसोटी सामना न खेळण्याच...