माझे वजन...
माझे वजन ... वजन कमी करायला सुरुवात केली तेव्हा मी काही फार लठ्ठ वगैरे नव्हतो किंवा डॉक्टरने बोलावुन मला निर्वाणीचा ईशाराही दिलेला नव्हता की आता वजन कमी करा नाहीतर तुमची खैर नाही वगैरे . मला शुगर वगैरेची सुद्धा समस्या नव्हती म्हणजे अजुनतरी आलेली नाही की ज्याच्यासाठी वजन कमी करण्याची गरज भासावी . माझे वजन ७७ ते ७८ किलोच्या आकड्यावर रूळलेले असायचे . १६८ सेंमी ऊंचीला ७८ किलो वजन चालते आणि वयानुसार थोडेफार ईकडे - तिकडे होणारच अशी मनाची समजुत काढुन आलेला दिवस पुढे ढकलणे हा एकमेव उपक्रम चालु होता . जाडजुड ढेरी सुटलेले मित्रही उंदराला मांजर साक्ष असल्याप्रमाणे या वयात वाढतेच रे वजन ( ढेरी ) असे म्हणुन एकमेकांच्या वाढत्या ढेरीवर आम्ही पांघरुन घालायचो . प्रत्येकाच्या कमरेवर चरबीची गोल चुंबळ तयार झालेली आहे या विषयावर सर्वांचे एकमत व्हायचे . आणि कोणालाही हा वाढत्या चरबीचा गोल कमी करता आलेला नसल्यामुळे एकमेका...