Posts

Showing posts with the label #Vasve

Krishna Confluence 200 Brevet

Image
Krishna Confluence 200 सुसाट २०० किमी. १३ नोव्हेंबर २०१६, पुणे रँदोनियर्सची २०० किमी ची ब्रेवेट. मे महिन्यातील नाईट बीआरएम नंतर मी एकही ब्रेवेट केलेली नव्हती. जवळजवळ ६ महीन्याच्या प्रदीर्घ विलंबानंतर मी २०० किमी सायकल चालवणार होतो. नविन कँलेंडर वर्षात जाताना मी सायकलसाठी नविन टायर ट्युब खरेदी केले. दिवाळीची अनावश्यक खरेदी टाळुन ते पैसे टायरमध्ये गुंतवले. मला हवे ते टायर्स मिळवुन देण्यासाठी रावेत येथील पेडल टाऊन सायकलिंगचे अभिजीत लोंढे यांनी खुप मदत केली. टायरची समस्या सोडवल्यानंतर मी वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी आहारात नियमितपणा आणुन ७ किलो चरबी उतरवली परत कोणी म्हणायला नको लई चरबी आलीये का? हाहाहा... नियमित सायकल चालवत राहिल्यामुळे वजन कमी होण्यास खुपच मदत झाली. आणि अनुभवी सायकलपटुंकडुन ज्या टिप्स मिळत गेल्या त्यांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करत राहीलो. या सर्व गोष्टींमुळे माझ्या सायकल चालवण्याच्या वेगामध्ये चांगलीच सुधारणा झाली. १३ नोव्हेंबरला ब्रेवेटच्या दिवशी भल्या पहाटे उठलो. यादीप्रमाणे सर्व साहीत्य बरोबर घेतले आणि वेळेत पुणे विद्यापीठ गाठले. योगेश शिंदे...