Posts

Showing posts with the label Green jersey

ग्रीन जर्सीचा सम्राट पीटर सागान.

Image
ग्रीन जर्सीचा सम्राट! पीटर सागान.   टूर द फ्रान्स म्हणजे सायकलिंग विश्वातील पंढरी. जसा पंढरीत गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही तसा टूर द फ्रान्समध्ये सायकल चालवल्याशिवाय कोणत्याही सायकलपटूचा जन्म सार्थकी लागत नाही. यावर्षी तर काही सायकलपटूंनी ऑलिम्पिक ऐवजी या ग्रँड टूरला प्रथम पसंती दिली आहे यावरून तुमच्या लक्षात येईल हे काय प्रकरण आहे ते. टूर द फ्रान्स पाहुन माझे जीवश्च कंठश्च म्हणतात, भावा, तु कधी जाणार टूर दि फ्रान्सला? मला माहीतीये माझी लायकी काय आहे ते, पण माझ्या मित्रांच्या निरागस प्रेमाला या जगात तोड नाही. मित्रप्रेम म्हणतात ते हेच. तर त्या टूर द फ्रान्समध्ये वेगवेगळ्या रंगांच्या जर्सी जिंकावयाच्या असतात. त्यातलीच एक बहुप्रतिष्ठीत ग्रीन जर्सी. मी जेव्हापासुन सायकल चालवायला सुरूवात केली तेव्हापासुन टूर द फ्रान्स न चूकता बघत आहे. आणि दरवर्षी हा पठ्ठ्या पीटर सागान ती ग्रीन जर्सी जिंकत आलेला आहे. सात वेळा ग्रीन जर्सी जिंकण्याचे जागतिक रेकॉर्ड याच्याच नावावर आहे. न भूतो न भविष्यति! पीटर सागान...नाम तो सुना ही होगा.. आपल्या क्रिकेटमध्ये जैसा सचिन तेंडुलकर तैसा सायकलिंगमध...