Posts

Showing posts with the label Vijay Vasve

आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२

Image
आपलं पुणे सायक्लोथॉन 2025 भाग-२  पूढे चालू टायमिंग चिप असलेला बिब सायकलच्या सीटखाली आणि साधा बिब जर्सीवर लावला. हेल्मेटला पुढे आणि मागे चिकटवण्यासाठी बिबचे स्टीकर दिलेले होते. फोटो मिळवण्यासाठी हे बिबचे स्टिकर महत्वाचे असल्यामुळे ते व्यवस्थित लावले. मग सायकल म्हणजे मेरीडा (मेरी डार्लिंग) रेससाठी सज्ज केली. सोबत आणलेल्या मोठया पंपाने चाकात ११० पीएसआय हवा भरली. गेटॉरस्कीन टायर सहाव्या वर्षात पदार्पण करूनही अजून दणदणीतपणे सायकलचा वेग आणि भार पंक्चर न होता सांभाळत आहेत. पंक्चर रुपी विघ्न सध्या तरी दोन हात लांब आहे. ब्रेक लागतोय का आणि ब्रेकचे रबर रीमला घासत नाहीयेत ना याची खात्री करुन घेतली. शर्यत सुरू होताना गर्दीमध्ये धडपडण्याची शक्यता असल्यामुळे सायकल कमी गियरवर सेट केली. सायकलला लावलेल्या सिपर बाटलीमध्ये स्टेडफास्ट न्युट्रीशनचे सेनर्जी आणि कार्बोरन्स भरुन घेतले आणि तशीच एक बाटली घशाखाली उतरवली. कार्बोरन्स घेतले की तहानभूकेची चिंता मिटते आणि रेसमध्ये आपली शारिरीक क्षमता पूर्ण ताकदीनिशी वापरता येते. शर्यत बरोबर साडेपाच वाजता सुरु झाली. प्रारंभ रेषेपासुन मागे थांबलेल...

पुणे गोवा पुणे सायकल मोहीम

Image
  पुणे गोवा पुणे सायकल मोहीम पुणे गोवा पुणे सायकल मोहीम यावर्षी दिवाळी झाली की गोवा सायकल मोहीम करायचीच असे मनोमन ठरवलेले होते. कोरोना महामारीच्या कचाटयातुन कशीबशी हळूहळू सूटका होत चाललेली होती. त्यामुळे प्रवासासाठी सूट मिळालेली होती, हॉटेल्स वगैरे व्यवस्थित सुरु झालेली होती. माझ्यासाठी एवढे पुरेसे होते. सायकल चालवताना रस्त्यात तहान लागल्यावर पाणी आणि भूक लागल्यावर अन्न मिळाले कि सायकलचा प्रवास सुखकर होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा गोव्याला जाणार होतो आणि तेही सायकलवर. आणि परतीचा प्रवास सुद्धा सायकलवरच करणार होतो. तेवढंच थोडं जगावेगळं. मला जगावेगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि सगळं जग जे करते त्यापासुन मी लांब राहतो. कदाचित याच कारणामुळे मी एवढे दिवस गोव्याला गेलेलो नाही. कधीतरी व्हिस्की पितो पण बीचवरील दृश्य बघण्यात मला कसलाही रस नाही. वातानुकूलित वाहनामध्ये प्रवास करण्याची मला अ‍ॅलर्जी आहे. एसी लावलेल्या कारमध्ये प्रवास केला कि मी आजारी पडलोच म्हणून समजा, असे ब-याचदा झालेले आहे. सायकल चालवताना मिळणारी स्वच्छ, मोकळी आणि ऑक्सीजनने परीपूर्ण असलेली हवा मला फार आवडते. बरेचजण गोव्याला साय...