Posts

Showing posts from September, 2021

कुंडलिका रिवर अल्ट्रा मॅरेथॉन

Image
कुंडलिका रिवर अल्ट्रा मॅरेथॉन  स्पर्धेचे अंतर - ५१ किमी (अल्ट्रा मॅरेथॉन)  स्थळ - स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका, कोलाड आयोजक - रनबडीज  स्पर्धेची वेळ - हि स्पर्धा ग्रामीण भागात आयोजित केली जाते. येथील रस्त्यावर विजेचे दिवे नसल्यामुळे सुर्योदय झाल्याशिवाय स्पर्धेला सुरुवात होत नाही. सकाळी ६:०० ते दुपारी १:०० यावेळेत ५१ किमी अंतर पळायचे असते. सुर्यनारायण तळपायला लागल्यावर पळणे असह्य होऊन जाते. सकाळी नऊ वाजता ३६ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. अंतराची विभागणी - ५१ किमी अंतर चार फे-यांमध्ये विभागलेले आहे. पहीली फेरी २१ किमी अंतराची नंतर १० किमीच्या तीन फे-या माराव्या लागतात. ५ किमी जायचे आणि ५ किमी यायचे असे दहा किमी. पाच किमीमध्ये १ किमीचा तीव्र उतार, १ किमी तीव्र चढ आणि बाकीचे अंतर कमी जास्त चढ उतारांनी भरलेले आहे जे नक्कीच सुसह्य वाटत नाहीत. या चढांवर नुसते चालणे सुद्धा अशक्यप्राय वाटत होते.  स्पर्धेचे हवामान - अतिशय दमट हवामान, असह्य उकाडा, तीव्र चढ आणि तीव्र उतार यापैकी कोणताही एक घटक तुम्हाला स्पर्धेतुन बाहेर घालवु शकतो. कधी कधी ढग सावली घेऊन...