Posts

Showing posts with the label वाल्या कोळी

रामनामाचे मिसाईल

Image
"रामनामाचे मिसाईल" (द्वारा विजय वसवे)  रामायणातील कथा अतिशय कर्णमधुर आहेत आणि त्या ऐकायला लागले कि असे वाटते त्या कधी संपुच नयेत. या मधुर कथा ऐकताना असे वाटते कि कोणीतरी कानांमध्ये अमृत सोडत आहे. कानांचे अमृतपानच जणु. कारण हरीकथा ऐकणे हेच कानांचे मुख्य काम आहे किंवा यासाठीच देवाने आपल्याला कान दिले आहेत हे पुराणांमध्ये सांगितलेले आहे.    सदरचा संवाद हा व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेला आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत आम्ही चार मित्र व्हिडीओ कॉलवरच होतो (व्हाटसअपवर चारच लोकांना घेता येते). मी त्यांना रामनामाच्या लॉंचिंगची कथा ऐकवली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे रामनामाचे लॉंचिंग काय प्रकार आहे....ऐका तर  तर झाले असे कि सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपुचा वध केल्यानंतर लाखो-हजारो वर्ष भगवंतांचा कोणताच अवतार झालेला नव्हता. त्रेतायुग सुरु झाले होते तरीही मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यप्राण्यांना सत्ययुगासारखीच कठोर तपश्चर्या करावी लागत होती. युग बदलले परंतु युगधर्म बदललेला नव्हता. मोक्षप्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर असणा-या व्यक्तींचे पराकोटींचे कष्ट कमी करण्यासाठी भगव...