Posts

Showing posts with the label Agasti Muni

रतनगड (Ratangad trek with FONA)

Image
    आम्हाला पुण्यातुन निघुन तळेगावातुन सुटणारी FONA ची बस रात्री ११:३० वाजता नाशिक फाटयावर पकडायची होती. निगडीला येण्यापेक्षा नाशिक फाटयावरच कुठेतरी गाडी पार्क करा, तुम्ही म्हणाल तिथुन तुम्हाला पिक करतो हे मनोज राणेंचं वाक्य मनाला खुप धीर देऊन गेलं होतं. नाशिक फाटयापेक्षा मी भोसरीत राजेशच्या घराजवळच गाडी लावण्याचे ठरवले, तो पार्कींगमध्येच लाव म्हणत होता पण मी मुद्दामच बाहेर लावली कारण परत येण्याची वेळ निश्चित नव्हती उगाच रात्री-अपरात्री आलो तर बिचा-याची माझ्यामुळे झोपमोड व्हायची. गाडी गेटच्या आत लावण्यासाठी त्याने खुप गळ घातली पण मी नाही ऐकलो. गाडी लावायला जागा मिळणे हेच माझ्यासाठी खुप होतं. राजेशने मनभरुन पाहुणचार केला आणि आमच्याबरोबर बस स्टॉपवरसुद्धा आला.     ११:४० च्या दरम्यान बस आली. बसमध्ये कुठे जागा मिळेल याचा विचार मनात घोळत होता, मी एकटा असल्यावर बसण्याच्या जागेची मुळीच चिंता करत नाही पण यावेळेस सहकुटुंब असल्यामुळे तो विचार मनात होता. बस थांबल्याबरोबर मुलांना आणि सौ. ला अगोदर चढुन दिले आणि मी त्यांच्या मागोमाग वर गेलो, बघतोय तर काय चक्क एक तीन सीटांची रांग...