Posts

Showing posts with the label #randonneurs

औरंगाबादमध्ये ३०० किमी सायकलिंग

Image
औरंगाबादमध्ये ३०० किमी सायकलिंग पुर्वतयारी;       पुण्याबाहेर ब्रेवे करण्याची इच्छा खुप दिवसापासुन मनात तग धरून होती. मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद ही पुण्याच्या जवळ असणारी शहरे. औरंगाबादमध्ये माझा मेव्हणा (सौ. चा सख्खा मोठा भाऊ)  बदली होऊन गेल्याने मला तिकडे जाऊन ब्रेवे करणे सोपे होते. औरंगाबाद जवळची प्रेक्षणीय स्थळेसुद्धा सौ.च्या नजरेखालुन काढायची होती. ब्रेवेबरोबर देवगिरी, वेरूळचे कैलास मंदिर, घृष्णेश्वर, बीबी का मकबरा, पणचक्की इ. ठिकाणे पाहण्याचा बेत आखुन मी ३०० च्या ब्रेवेला नाव नोंदवले. सौ.ला माझा बेत सांगितल्यावर तिने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ६ जानेवारीला भल्या पहाटे आम्ही पुणे सोडले. पहाटेची वेळ असल्यामुळे कणभरही ट्रॅफिकचा त्रास जाणवला नाही. औरंगाबादमध्ये पोचल्यावर त्याचदिवशी भरपुर भटकंती उरकुन घेतली. देवगिरी, वेरूळचे कैलास मंदिर आणि घृष्णेश्वर एकाच दिवसात उरकले. शनिवारी सकाळी औरंगाबादमध्ये ब्रेवेच्या रुटवर ५६ किमी राईड करुन रस्त्याचा अंदाज घेतला. औरंगाबाद ते जालना रोड मस्तच होता. शनिवारी दुपारी गाढ झोप घेऊन थकवा आणि प्रवासाने आलेला क्षीण कमी करण्या...

Strawberry Fields 300 BRM

Image
Strawberry Fields 300 BRM Audax India Event - 300 BRM on 27-Nov-2016 at 06:00 Pune Randonneurs | Pune, Maharashtra थोडक्यात माहीती: अंतर = ३०० किमी वेळेची मर्यादा = २० तास मार्ग = पुणे विद्यापीठ - चांदणी चौक - कात्रज दरीपुल - खंबाटकी घाट - वाई - पसरनी घाट - पाचगणी - महाबळेश्वर - केळघर घाट - मेढा - सातारा - औंध पुणे (स्टारबक). अटी = ईतर कोणाचीही मदत न घेता सायकल चालवत स्वत:च्या कर्तृत्वावर ३०० किमी अंतर पुर्ण करणे.     पहाटे घरातुन बाहेर पडल्या पडल्या लगेच स्ट्रावाला रेकॉर्डींगच्या कामाला लावले आणि मोबाईल सायलंट करुन खिशात ठेवुन दिला. स्टार्ट पॉइंटला पोचल्यावर माझ्या पंक्चरचाच विषय पुढे आला आणि त्यावरील चर्चाही रंगली. पण सर्व मित्रांनी पंक्चर होऊ नये म्हणून खुप शुभेच्छा दिल्या आणि काहींनी पंक्चरचे विघ्न येऊ नये म्हणून देवाला प्रार्थनाही केल्या. एवढे जीव लावणारे मित्र या सायकलिंगमुळे भेटले. अजुन काय हवंय आपल्याला? आता पंक्चर झाली असती तरीही मी दुःखी झालो नसतो. या ब्रेवेटमधला बराचसा मार्ग हा जवळजवळ डेक्कन क्लिफहँगरचाच असल्या मुळे मी डिसीची जर्सी घालायचे ठरवले....