Posts

Showing posts with the label #brm #randonneurs #pune #audax #cycling #cyclists #hybrid

Strawberry Fields (300 किमी सायकलिंग)

Image
SR ची Brevet          श्वाल्बे टायर प्रसन्न झाल्यामुळे आणि माझ्या अचानक उफाळून येणाऱ्या मुर्खपणामुळे ३०० च्या ब्रेवेटला मोठ्ठा DNF मिळालेला होता. त्यामुळे या कॅलेंडर वर्षात २००, ४०० आणि ६०० चे ब्रेवेटस यशस्वीरीत्या पुर्ण करुनही मी सुपर रॅंदोनिअर झालो नव्हतो. ६०० ला अपयश येऊन SR झालो नसतो तर समजण्यासारखे होते पण ३००च्या अपयाशामुळे SR होता आले नाही ही नक्कीच दुख वाटण्यासारखी बाब होती. आणि मी दुःखी होतो. १२ मार्चला ३०० चे ब्रेवेट पुर्ण करून या दुखावर मला फुंकर घालायची होती. त्यामुळे  चातक पक्ष्याप्रमाणे मी १२ मार्चची वाट पाहत होतो. रेकॉर्ड बनवणारे सायकलपटु संतोष होली यांनी मला फोन करून माझ्याबरोबर ३०० ची ब्रेवेट करण्याची इच्छा व्यक्त केली तेही त्यांच्या मारीचवर (गियर नसलेली सायकल). अशा प्रकारे रँदोनियर्सची संख्या वाढत असेल  तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. या कॅलेंडर वर्षात माझ्या मित्र परीवारातील पुणे रँदोनियर्सचे सभासदत्व घेऊन ब्रेवेट पुर्ण करणारे संतोष होली हे ४ थे सायकलपटु. याअगोदर युवराज सोनार यांनी २०० ची ब्रेवेट पुर्ण केली तर आशुतोष वाघमारे आणि ध...

एक टायर फुटका...

Image
शनिवारी ५ डिसेंबरला ३००ची बीआरएम होती आणि मंगळवारी सकाळी झोपेतून उठतानाच मी तापाने फणफणलो होतो. अंगात कोणतेही त्राण जाणवेना. साध्या साध्या हालचाली करायलासुद्धा प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते. तापामुळे अशक्तपणा आलेला होता. अशा अवस्थेमुळे मी बीआरएमचा विचार डोक्यातुन काढुन टाकला. ताबडतोब पुर्ण बरा होणे अशक्य होते आणि बरा झालो तरी लगेच ३०० कि.मी. सायकल चालवणे शक्य होईल की नाही याबाबत मलाच खात्री नव्हती. सौ. ने माझे मनोबल उंचावण्यासाठी चांगलाच हातभार लावला. रोज तापावरची औषधे चालुच होती. बीआरएम च्या आदल्या रात्री तापाची गोळी खाऊन झोपलो आणि असे ठरवले की उद्या पहाटे उठल्यावर थोडा जरी अंगात ताप असला किंवा थोडी जरी कसकस जाणवली तर बीआरएमला जायचे नाही. मला रात्रभर म्हणावा असा डोळ्याला डोळा लागला नाही. दर तासाला मला जाग यायची आणि मी मोबाईलमध्ये वेळ पहायचो. कधी एकदाचे ४ वाजतील असे झाले होते. मोबाईलचा अलार्म वाजण्या अगोदरच धनंजयचा फोन आला आणि मी जागा झालो. अंगात ताप बिलकुल नव्हता, अंगसुद्धा दुखत नव्हते पण तोंडात कडवटपणा जाणवत होता. मी सौ. बरोबर थोडी चर्चा केली. सायकल चालवण्यास मला काहीही त्रास होणार ना...