Posts

Showing posts with the label treks in Sahyadri

प्रबळगड आणि कलावंतीण

Image
"प्रबळगड आणि कलावंतीन"           28 सप्टें ला एकदाचा कलावंतीनदुर्ग करण्याचा योग आला. याच दिवशी लाईफ सायकलची पांचगणी १०० कि. मी. ची सायकल शर्यतसुद्धा होती, पुणे व्हेंचर्सचा हरिश्चंद्रगड ट्रेकही याच दिवशी होता. कुठे जावं काही कळत नव्हतं. १०० कि. मी. ची सायकल शर्यत मला जिंकणे शक्य नव्हते त्यामुळे नुसते श्रम एव ही केवलम करण्यात काहीच अर्थ नव्हता. हरिश्चंद्रगडला आदल्या दिवशी मुक्कामी जावयाचे होते त्यापेक्षा FONA चा प्रबळगड ट्रेक सकाळी निघुन संध्याकाळी परत येण्याचा, मस्त वाटला. लगेच मनोज राणेंच्या अकाऊंटवर ५०० रूपये हस्तांतरित केले आणि विंडो सीट बुक करून ठेवली. :D           बसप्रवास निगडीपासुन सुरू होणार होता. धायरी ते निगडी कसे पोचावे? या विचारात असतानाच राणेंच्या एका ई-मेल ने एक भन्नाट कल्पना सुचवली होती. शिवाजीनगर ते तळेगांव स्टेशन लोकलने यायचे आणि तळेगांव स्टेशनला बस पकडायची. व्वा भारी एकदम, याला म्हणतात thinking out of box. मग यात माझं सायकलप्रेम ऊतु गेलं नाही तर नवलच. शिवाजीनगर पर्यंत मी सायकल घेऊन गेलो...