दापेसर ते धायरी सायकलवर परतीचा प्रवास
धायरी ते दापेसर अंतर सायकलवर पार करणारे सायकलपटु; धनंजय कोंढाळकर, वाघमारे, दत्तात्रेय पवार, राहुल कोंढाळकर, सचिन ठाकरे, विजय वसवे, मिलींद पोकळे, संतोष चाकणकर आणि सुनिल धाडवे. धायरी ते दापेसर सायकल चालवत जरी आम्ही नऊच जण आलेलो असलो तरी बाकीची मंडळीं राहुलच्या फार्म हाऊसवर आमच्या अगोदरच पोहोचलेली होती. सेवेसाठी असलेली जिप्सी त्यांनी प्रवासासाठी उपयोगात आणली होती. अर्ध्यात सायकल चालवायचे सोडुनसुद्धा बरेच जण दमल्यासारखे वाटत होते. सगळया बाज हाऊसफुल होत्या. भर उन्हात सायकल चालवणे खुप तापदायक ठरते विशेषत: जेव्हा तुमच्याकडची रसद आणि पाणी संपलेले असते. सायकलींग करताना रसद म्हणुन कॅडबरी अतिउत्तम, सायकलिंगला जाताना छोटया साईजच्या फाईव्ह स्टार किंवा डेअरी मिल्क खुप उपयोगी ठरतात, त्यानंतर पार्ले-जी बिस्कीटस (सध्या + नावाने यांची बिस्कीटे मिळतात ती खुप उपयोगी आहेत-धनंजय कोंढाळकर), चॉकलेटस आणि तुम्ही जर खुप वेळ सायकल चालवली तर तुम्ही काहीही पचवु शकता असा माझा अनुभव आहे. पाणी तर बरोबर असायलाच पाहीजे, पण पाणी पिताना एकदम घटघट...