Posts

Showing posts from January, 2019

माझा होम ट्रेनर

Image
“ माझा होम ट्रेनर ”       ट्रायथलॉनवाल्यांच्या नादाला लागुन सरतेशेवटी मीसुद्धा एक होम ट्रेनर विकत घेतला. आता ट्रायथलॉनसारखा महागडा शौक पाळायचा म्हणजे खर्च तर होणारच. सस्ती चीजोंका शौक हम नहीं रखते वगैरे डायलॉग सिनेमात शोभुन दिसतात परंतु प्रत्यक्ष जीवनात खर्च करताना खिशाला काय परवडतंय हा विचार सर्वप्रथम करावा लागतो. मोर नाचला म्हणुन लांडोर नाचवण्यात काही अर्थ नसतो. म्हणुन मी खिशाला परवडेल असा एक साधासुधा जपानच्या कंपनीचा होम ट्रेनर विकत घेतला. माझ्या ट्रेनरला चार पाय, पाच गियर. एक रोलर, चाकाला मगरमिठी मारणारे दोन जबडे, एक लांबलचक वायर आणि तिला जोडलेला एक नॉब आहे. या नॉबने रोलरचे फ्रिक्शन कमी-जास्त करता येते. त्याचा रंग काळा आहे म्हणजे त्याला कोणाची नजर लागण्याचा प्रश्नच नाही. त्यावर “मेड इन जपान” लिहण्याऐवजी प्रत्यक्ष जपानचा छोटासा झेंडाच छापलेला आहे. तर असा आहे माझा होम ट्रेनर. माझा होम ट्रेनर मला फार आवडतो. माझ्या होम ट्रेनरवर माझे खुप प्रेम आहे आणि होम ट्रेनरवर सायकल चालवण्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. ज्यादिवशी मी ट्रेनर घेतला त्यादिवशी कामाला मी चक्...