Posts

Showing posts with the label #Strawberry

Strawberry Fields 300 BRM

Image
Strawberry Fields 300 BRM Audax India Event - 300 BRM on 27-Nov-2016 at 06:00 Pune Randonneurs | Pune, Maharashtra थोडक्यात माहीती: अंतर = ३०० किमी वेळेची मर्यादा = २० तास मार्ग = पुणे विद्यापीठ - चांदणी चौक - कात्रज दरीपुल - खंबाटकी घाट - वाई - पसरनी घाट - पाचगणी - महाबळेश्वर - केळघर घाट - मेढा - सातारा - औंध पुणे (स्टारबक). अटी = ईतर कोणाचीही मदत न घेता सायकल चालवत स्वत:च्या कर्तृत्वावर ३०० किमी अंतर पुर्ण करणे.     पहाटे घरातुन बाहेर पडल्या पडल्या लगेच स्ट्रावाला रेकॉर्डींगच्या कामाला लावले आणि मोबाईल सायलंट करुन खिशात ठेवुन दिला. स्टार्ट पॉइंटला पोचल्यावर माझ्या पंक्चरचाच विषय पुढे आला आणि त्यावरील चर्चाही रंगली. पण सर्व मित्रांनी पंक्चर होऊ नये म्हणून खुप शुभेच्छा दिल्या आणि काहींनी पंक्चरचे विघ्न येऊ नये म्हणून देवाला प्रार्थनाही केल्या. एवढे जीव लावणारे मित्र या सायकलिंगमुळे भेटले. अजुन काय हवंय आपल्याला? आता पंक्चर झाली असती तरीही मी दुःखी झालो नसतो. या ब्रेवेटमधला बराचसा मार्ग हा जवळजवळ डेक्कन क्लिफहँगरचाच असल्या मुळे मी डिसीची जर्सी घालायचे ठरवले....