Posts

Showing posts from March, 2020

मलेशियामध्ये आयर्नमॅन व्हायचे असेल तर

Image
मलेशियामध्ये आयर्नमॅन व्हायचे असेल तर .... मलेशियामध्ये आयर्नमॅन कोण होऊ शकतो/शकते?      आयर्नमॅन ट्रायथलॉनमध्ये ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे या तीन क्रिडा प्रकारांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रिडा प्रकार पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या क्रमानेच करावयाचे असतात. मी आयर्नमॅन होऊ शकतो का? किंवा मला आयर्नमॅन व्हावयाचे असेल तर माझ्यामध्ये कोणती पात्रता असणे आवश्यक आहे? असा प्रश्न सर्वांच्या मनात येतच असेल. खरेतर यासाठी कोणतीही पात्रता नाही, आपल्यापैकी कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. ज्याला देवाने कमी संपत्ती आणि शारीरीक क्षमता जास्त दिलेली आहे अशा व्यक्तीने मलेशिया येथे आयर्नमॅन करावे. शारीरीक क्षमता कमी असेल तर ती वाढवण्यावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. नियोजनबद्द सराव करुन आयर्नमॅन होण्यासाठी लागणारा दम वाढवता येतो. ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे हे अंतर पुर्ण करणार्यालाच “आयर्नमॅन” असे संबोधतात. भारतात गोव्यामध्ये जी आयर्नमॅन स्पर्धा भरवली जाते ती पुर्ण केल्यावर आयर्नमॅन हा किताब मिळत नाही कारण...