Posts

२०० चा नवा रुट

Image
२०० चा नवा रुट     मथळा वाचुन २०० रुपयाला एखादा रुट विकत घेतला की काय असे वाटले ना? छे..छे.. तसं काही नाहीये. २०० च्या बीआरएमसाठी म्हणजे आपल्या भाषेत सायकलिंगसाठी हा नविन मार्ग निर्धारीत करण्यात आला होता. २०० किमीच्या ब्रेवेसाठी. आता ब्रेवेट न म्हणता फक्त ब्रेवे म्हणायचे. फ्रेंच लोकांना ’ट’ म्हणता येत नाही म्हणुन आपणही ’ट’ म्हणायचे नाही. आपण रेस्टॉरंट म्हणतो पण त्यालाच फ्रेंच व्यक्ती रेस्तरॉं म्हणतो. नविन कहीतरी शिकायला मिळतंय. नवनविन काय मिळेल ते शिकत रहावे. तर हा नविन रूट १९ मार्चला पुणे रॅंदोनियर्समध्ये समाविष्ट करण्यात आला. चांदणी चौकातुन सुरुवात, मग पौड फाटा, कर्वे रोड, म्हात्रे पुल पार करुन टिळक रोडने स्वारगेट, पुलगेट, हडपसर, यवत, केडगांव चौफुला, उजवीकडे वळून निरा, मग लोणंद, पुन्हा उजवीकडे वळून खंडाळा (खंबाटकी घाटाजवळ), पुन्हा उजवीकडे वळून एनेच४ वरुन सरळ चांदणी चौकात पोचले की झाली आपली ब्रेवे. पुण्याच्या पुर्वेला जाऊन एक गोल फेरी मारुन आल्यासारखे वाटते. पुणे रॅंदोनिअर्सचा हा रींग रुटच म्हणता येईल. फक्त बाहेरगावावरुन येणा-यांसाठी मात्र हा रुट डोकेदुखी ठरू शकतो. पु...

औरंगाबादमध्ये ३०० किमी सायकलिंग

Image
औरंगाबादमध्ये ३०० किमी सायकलिंग पुर्वतयारी;       पुण्याबाहेर ब्रेवे करण्याची इच्छा खुप दिवसापासुन मनात तग धरून होती. मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद ही पुण्याच्या जवळ असणारी शहरे. औरंगाबादमध्ये माझा मेव्हणा (सौ. चा सख्खा मोठा भाऊ)  बदली होऊन गेल्याने मला तिकडे जाऊन ब्रेवे करणे सोपे होते. औरंगाबाद जवळची प्रेक्षणीय स्थळेसुद्धा सौ.च्या नजरेखालुन काढायची होती. ब्रेवेबरोबर देवगिरी, वेरूळचे कैलास मंदिर, घृष्णेश्वर, बीबी का मकबरा, पणचक्की इ. ठिकाणे पाहण्याचा बेत आखुन मी ३०० च्या ब्रेवेला नाव नोंदवले. सौ.ला माझा बेत सांगितल्यावर तिने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. ६ जानेवारीला भल्या पहाटे आम्ही पुणे सोडले. पहाटेची वेळ असल्यामुळे कणभरही ट्रॅफिकचा त्रास जाणवला नाही. औरंगाबादमध्ये पोचल्यावर त्याचदिवशी भरपुर भटकंती उरकुन घेतली. देवगिरी, वेरूळचे कैलास मंदिर आणि घृष्णेश्वर एकाच दिवसात उरकले. शनिवारी सकाळी औरंगाबादमध्ये ब्रेवेच्या रुटवर ५६ किमी राईड करुन रस्त्याचा अंदाज घेतला. औरंगाबाद ते जालना रोड मस्तच होता. शनिवारी दुपारी गाढ झोप घेऊन थकवा आणि प्रवासाने आलेला क्षीण कमी करण्या...

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-२

Image
पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-२      साधारण ३०० किमी सायकल चालवल्यानंतर जेवताना घनपदार्थ लवकर घशाखाली उतरत नाहीत तरीसुद्धा त्यांना बळेच पोटात ढकलावे लागते. नाहीतर सायकल चालवण्यासाठी उर्जा कुठुन मिळणार? प्रत्येक घासाबरोबर पाण्याचा एक घोट घेतला की त्यांना घशाखाली ढकलायचे काम सोपे होते. भाताच्या एका घासाबरोबर मी एक चमचा सूप घेत होतो. सूप आणि भात खाऊन झाल्यावर मी लगेच परतीच्या तयारीला लागलो. छोट्या पंपाने दोन्ही चाकात १३० पीएसआय हवा भरुन घेतली म्हणजे कमी हवेमुळे वेग कमी व्हायला नको आणि पंक्चरची पण भिती नको. थंडीचा सामना करायचा होता त्यामुळे मी कान आणि डोके गरमच्या टोपीने मस्त झाकुन घेतले. तेवढ्यात आशिश तेथे आला आणि जाऊ या बरोबर म्हणाला. ईथुन पुढचा ३०० किमी सायकलप्रवास मी आता आशिशबरोबर करणार होतो. रात्री १० वाजुन ४५ मिनिटांनी आम्ही राजधानी हॉटेल (संकेश्वर) सोडले. संकेश्वरपासुन हायवेपर्यंतचा रस्ता एवढा खराब आहे की पुण्याच्या जवळपास उदाहरण देण्यासाठी एवढा खराब रस्ता कुठेच नाही. संकेश्वरचा फ्लायओव्हर ओलांडल्यानंतर उजवीकडे वळलो आणि सर्व्हीस रोडने महामार्गावर आलो. आता हाच मह...