Posts

केदारनाथ धाम

Image
 केदारनाथ धाम  केदारनाथ मंदिर      केदारनाथ येथे भगवान शंकराचे पांडवांनी बांधलेले मंदिर आहे. हे मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यात मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. केदारनाथ धाम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे. ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी तसेच पंचकेदार व छोटा चार धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केलेली असून आद्य शंकराचार्यांनी बर्फाने आच्छादलेले हे मंदिर त्यांच्या अनुयायांसह शोधून काढले. आद्य शंकराचार्यांनी देहत्याग करण्यासाठी हेच ठिकाण निवडले. केदारनाथ हे सर्वाधिक उंचीवर स्थित असलेले ज्योतिर्लिंग आहे. काशी-केदार महात्म्य सांगते कि याठिकाणी "मुक्तीचे पीक" उगवते. जन्म मृत्युचा फेरा चुकवायचा असेल तर हे दर्शन अनिवार्य आहे. येथे भेट देण्यासाठी खडतर प्रवास तसेच येथील लहरी हवामानाचा सामना करावा लागतो. येथील थंडी आणि भयकंपित करणारा पाऊस श्रद्धाळुंच्या मनात धडकी भरवतात. गौरीकुंड ते केदारनाथ हा १८ किलोमीटरचा खडतर प्रवास आहे. ऑगस्टमध्ये गेलो तेव्हा गारमीनमध्ये हे अंतर दाखवले. प्रलयामध्ये ज...

Umbarkhind trek

Image
ट्रेक उंबरखिंड विजयस्तंभ       मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा  शाइस्ताखान, शाहिस्तेखान, शाइस्तेखान हा  दख्खनचा सुभेदार असताना छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता.  पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान जनतेवर प्रचंड प्रमाणात अन्याय, अत्याचार व लुटालूट करत होता. मुघल सैन्याबरोबर समोरासमोर युद्ध करण्याएवढे सैन्यबळ नसल्यामुळे महाराजांचा नाईलाज होता.       जून १६६० ला  त्याच्या बलाढ्य फौजेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला होता. त्यानंतर  १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने उझबेग सरदार कारतलब खानास छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्याच्या धाडसी योजनेवर रवाना केले. कारतलब खानासोबत सावित्रीबाई उर्फ रायबाघण तसेच मुघलांचे अनेक सरदार ह्या मोहिमेत सहभागी झालेले होते. फौजफाटा जवळजवळ ३० हजारांवर होता.       २ फेब्रुवारी इ.स.१६६१ ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्य...