ड्रायफ्रूटचे लाडु
कोणतीही गोष्ट करुन पाहत असताना मी नेहमी सिनियर सायकलपटुंचा सल्ला घेतो किंवा त्यांच्याशी चर्चा तर नक्कीच करतो जे या मार्गावर अग्रेसर आहेत आणि या क्षेत्रात ज्यांनी प्राविण्य मिळवलेले आहे. पुण्यातील एकमेव महीला चॅम्पियन सायकलपटु अंजली भालिंगे यांच्याशी मी सल्लामसलत करुन त्यांच्या एनर्जी बारविषयी माहीती मिळवली. त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतुन त्यांनी माझ्यासारख्या सामान्य सायकलपटुसाठी वेळ काढला हे माझे सौभाग्यच. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन मला एनर्जी बारविषयी खुप उपयुक्त माहीती मिळाली. त्यंनी सांगितल्यासारखा एनर्जी बार मला बनवता आला नाही परंतु त्यांनी सांगितलेल्या पदार्थांपासुन मी ड्रायफ्रुटचा लाडु हा नाविन्यपुर्ण पदार्थ बनवला. माफ करा मी नाही बनवला तो बनवला सौ. ने. सौ. ला सर्व माहीती सांगितल्यानंतर तिने बरोबर मला जसा हवा होता अगदी तसाच लाडु बनवला. डींक लाडुशी साधर्म्य असलेला ड्रायफुटचा लड्डु. हे लड्डु खाऊन मी अनेक लांब पल्ल्याच्या ब्रेवे लिलया पुर्ण केलेल्या आहेत. या लड्डु खाण्याच्या सवयीवरुन मला ब्रेवेमधील सहकारी छोटा भीम म्हणायला लागले होते.
मी फक्त दोन प्रकारचे खाद्य पदार्थ बरोबर न्यायचो. एक ड्रायफ्रुट्चे लाडु आणि दुसरे चिकन क्रॅकर्स आणि तिसरे म्हणजे मीठ-साखरेचे पाण्यातील मिश्रण.
ड्रायफ्रुटचे लाडु
लड्डु बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे:
- आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घेऊन ते मंद आचेवर भाजुन घ्यावेत. उदा. बदाम, काजु, खारीक, अक्रोड, मनुके, मऊ प्रकारातले खजुर इ. आवड असल्यास डिंकसुद्धा चालेल.
- या सर्वांना मिक्सरमध्ये अथवा खलबत्त्यात कुटुन शक्य तेवढी बारीक पुड करावी.
- गूळ आणि गाईचे तुप एकत्र गरम करुन अथवा वेगवेगळे गरम केले तरी चालेल ते ड्रायफ्रुटच्या मिश्रणावर ओतावे.
- गुळ, गाईचे तुप आणि ड्रायफ्रुटचे मिश्रण हातात घेण्याइतपत थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे लाडु बनवावेत.
- साधारण एका घासातच लाडु खाता येईल एवढी साईज असावी.
- चवीला गोड असल्यास उत्तम.
- मोठ्या साईजचा लाडु केल्यास खाताना एका हातात लाडु धरुन एका हाताने सायकल चालवावी लागते म्हणुन एका घासाएवढीच साईज असावी.
- प्रत्येक २० ते ३० किमी नंतर किंवा दर एक तासाला हा एक लाडु खाल्ल्यास सायकल चालवायला चांगली उर्जा मिळते. (मला तरी मिळाली)
- यामधील कोणताही खाद्यपदार्थ खराब होण्यासारखा नसल्यामुळे हे लाडु महीनोमहीने टिकतात.
- आपल्या शरीरावर याचा कोणताही दुष्परीणाम होत नाही.
- गुळामुळे शरीरातील साखरेचा समतोल राखण्यास मदत होते.
- पचनसंस्थेला सवय व्हावी म्हणुन इवेंटच्या दोन ते तीन दिवस अगोदर रोज एकदोन लाडु खात रहावे.
No comments:
Post a Comment