Posts

दहावीच्या सुट्टीतील पेपरबॉय

Image
दहावीच्या सुट्टीतील पेपरबॉय हा फोटो माझा नाही, आंतरजालातून साभार .            दहावीची परीक्षा संपली. स्वकष्टावर पैसे मिळ्वण्यासाठी काहीतरी काम करायचे मी ठरवले होते. सकाळी तासभर पेपर वाटले की दिवसभर बाकीचे उद्योग करायला मी मोकळा. त्यामुळे दहावीच्या सुट्टीत मी पेपरबॉय व्हायचे ठरवले. सुनिल पवार हे आमच्या भागातील सर्वात जुने वृत्तपत्र व्यवसायिक. आमच्याकडे त्यांचाच पेपर यायचा. पेपर म्हणजे न्युजपेपर (वृत्तपत्र) असा अर्थ घ्यावा. अजुनही सगळे पेपर असेच म्हणतात. एका सकाळी मी सुनिल पवारांना विचारले, "तुमच्याकडे पेपर टाकायचे काम मिळेल का?" सुनिलभाऊने एकही दिवस वाया जाऊ न देता मला दुसऱ्या दिवसापासुन रूजु करून घेतले. धायरीफाटा, नऱ्हे, धायरी, नांदेड या सर्व भागात सुनिलभाऊचेच पेपर असायचे. तिघे भाऊ मिळुन पेपर टाकत होते. माझी अपेक्षा होती की मी जिथे राहतो त्याच भागातील पेपर टाकायचे काम मला मिळेल. पण तसे काही झाले नाही. मला नांदेडच्या लाईनवर टाकले. धायरीफाटा, लगडमळा, दळवीनगर आणि नांदेडगाव अशा लांब पल्ल्याच्या लाईनवर माझी रवानगी झाली. नंतर मला कळले की या लाईनवर प...

300 चे ब्रेवेट

Image
300 चे ब्रेवेट Brief Details; Date: 11 Oct 2014 Starting point: Cafe Nook, Baner End Point: Cafe Nook, Baner Distance: 306.06 KM Duration: 20 Hrs Time: 06:00 am to 02:00 am  Entry Fee: INR 650/- Medal (if required): INR 500/- Route Map:  Kokan Climber 300 Elevation: The route has a total ascent of 2898.86 m and has a maximum elevation of 685.44 m   Ghat Section:  The  Bor ghat  cuts the  Sahyadri  range to join  Khandala  to  Khopoli.  This                                   ghat stretches almost 18 km. Randonneurs : Vijay Vasve, Mahesh Nimhan, Abhijit Deshpane, Amol kanawade, Gokul Raju,                          and 7 others. बाणेर येथील कॅफे नुक पासुन सकाळी ६:०० वाजता सुरुवात. २० तासांमध्ये अलिबाग समुद्र किना-यावर चेक करुन पुन्हा याच ठिका...

किल्ले तोरणा

Image
किल्ले तोरणा किल्ले तोरणा (प्रचंडगड) समुद्रसपाटीपासुन उंची- १४०३ मी. (४६०४ फुट) ठिकाण-                         वेल्हे (पुणे शहरापासुन ५० कि.मी.) श्रेणी-                             अवघड पहावयाची ठिकणे- कोठी दरवाजा, बिनी दरवाजा, झुंजार माची, बुधला माची, तोरणा ते राजगड ट्रेकचा मार्ग,                              मेंगाई मंदिर, हनुमान बुरुज, कोकण दरवाजा, रडतोंडी बुरुज, चित्ता दरवाजा व शिल्प,                                    घोडेजिन टोक, विशाळटोक बुरुज, हत्तीमाळ बुरुज, चिणला दरवाजा,                              किल्ल्यावरुन दिसणारे गुंजवणी धरण आणि वेल्हे गावातील महाराजांचा पुतळा. ईतर व्यवस्था-     ...

कोकणदिवा ट्रेक

Image
कोकणदिवा                     कोकणदिव्याची माहीती घेत असताना वाचण्यात आलं की अलीकडेच हा उजेडात आला आहे. हे वाचल्या वाचल्या मला पडलेला प्रश्न म्हणजे दिवा अंधारात कसा काय राहु शकतो? तो उजेडातच होता पण तो दिसण्याची दृष्टी आपल्याकडे नव्हती असे  म्हणल्यास वावगे वाटु नये. कोकणदिवा बघण्याची तीव्र ईच्छा मनात जागृत झालेली होती आणि ती प्रत्यक्षात उतरवणे अत्यंत गरजेचे वाटु लागले होते. नुसती ईच्छा मनात येऊन उपयोग नसतो, अशा कैक इच्छा समुद्रावर ज्याप्रमाणे एका सेकंदात असंख्य लाटा तयार होत असतात तशा माझ्या मनात येत असतात. त्यातल्या बऱ्याच काही किनाऱ्याला पोचल्यावर लुप्त होऊन जातात. पण त्यातली एखादी तरी त्सुनामीसारखी असते, तांडव घातल्याशिवाय ती जात नाही. कोकणदिवा बघण्याची तीव्र ईच्छा हि त्यातलीच एक. ज्या भागात कोकणदिवा आहे तो अतिशय दुर्गम आहे. घोल पर्यंत एसटी सेवा उपलब्ध आहे.         ट्रेकिंग हे काही एकटया दुकटयाचे काम नव्हे. त्यामुळे जोडीला मित्र असणे अपरीहार्य आहे. मित्रसुद्धा असे असायला हवेत की त्यांना...