Posts

पंढरपुर सायकलवारी (आयसीसी )

Image
सायकलवारी भाग-१             माझ्या आयुष्यात मी एकदाही पंढरपुरला गेलेलो नव्हतो. आहे की नाही कमाल? केवढा हा करंटेपणा! जे प्रत्यक्ष भुलोकीचे वैकुंठ, जिथे साक्षात परब्रम्ह, परमेश्वर, वासुदेव श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रुपात कमरेवर हात ठेवुन ऊभे आहेत त्यांच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी मी अजुनही गेलेलो नव्हतो. याची खंत तर वाटणारच. खंत काय एखादे शल्य बोचत असल्यासारखे वाटायचे. मागच्या जन्मीची पापे याला कारणीभुत असावीत त्यामुळेच पांडुरंगाच्या भेटीला एवढा ऊशिर झाला. ज्या भुमी प्रदेशात जन्म होतो, तेथील राजा, तेथुन वाहणारी नदी आणि त्या प्रदेशाच्या सर्वात जवळ असणारे तिर्थक्षेत्र यांना मनुष्य जन्मामध्ये अनन्यसाधारण महत्व असते. सर्वात जवळचे तिर्थक्षेत्र पंढरपुर आणि कमरेवर हात ठेऊन ऊभा असलेला श्रीहरी पांडुरंग माझे दैवत आणि आपणा सर्वांची माऊली. हिच माऊली दक्षिणेत श्री बालाजी, पुर्वेस श्री जगन्नाथ, उत्तरेत स्वत: बांकेबिहारी श्रीकृष्ण आणि पश्चिमेस श्रीनाथजी बनुन युगानुयुगे ईतर भक्तांनाही दर्शन देत आहे. हजारो वर्षांपासुन त्या त्या प्रदेशातील लोक भगव...