धायरी ते दापेसर अंतर सायकलवर पार करणारे सायकलपटु;
धनंजय कोंढाळकर, वाघमारे, दत्तात्रेय पवार, राहुल कोंढाळकर, सचिन ठाकरे, विजय वसवे, मिलींद पोकळे, संतोष चाकणकर आणि सुनिल धाडवे.
धायरी ते दापेसर सायकल चालवत जरी आम्ही नऊच जण आलेलो असलो तरी बाकीची मंडळीं राहुलच्या फार्म हाऊसवर आमच्या अगोदरच पोहोचलेली होती. सेवेसाठी असलेली जिप्सी त्यांनी प्रवासासाठी उपयोगात आणली होती. अर्ध्यात सायकल चालवायचे सोडुनसुद्धा बरेच जण दमल्यासारखे वाटत होते. सगळया बाज हाऊसफुल होत्या. भर उन्हात सायकल चालवणे खुप तापदायक ठरते विशेषत: जेव्हा तुमच्याकडची रसद आणि पाणी संपलेले असते.
सायकलींग करताना रसद म्हणुन कॅडबरी अतिउत्तम, सायकलिंगला जाताना छोटया साईजच्या फाईव्ह स्टार किंवा डेअरी मिल्क खुप उपयोगी ठरतात, त्यानंतर पार्ले-जी बिस्कीटस (सध्या + नावाने यांची बिस्कीटे मिळतात ती खुप उपयोगी आहेत-धनंजय कोंढाळकर), चॉकलेटस आणि तुम्ही जर खुप वेळ सायकल चालवली तर तुम्ही काहीही पचवु शकता असा माझा अनुभव आहे. पाणी तर बरोबर असायलाच पाहीजे, पण पाणी पिताना एकदम घटघट आणि एकावेळी जास्त पाणी पिऊ नये, सायकलला लटकवलेल्या सिपर बॉटलमधुन अधुन-मधुन एक-एक पाण्याचा सिप घेत राहणे उत्तम. यामुळे तुम्हाला पाणी पिण्यासाठी सायकल थांबवावी लागत नाही. एवढे सगळे माहीत असुनसुद्धा आमच्याकडे यातले काहीच नव्हते. असोत...
भुकेच्या तडाक्यात चिकन रस्सा, गरमा-गरम भाकरी आणि चिकन बिर्याणीवर आडवा हात मारला. एवढी भुक लागली होती की कितीही खाल्ले तरी पोटच भरल्यासारखे वाटत नव्हते. शेवटी चावुन चावुन जबडा दुखायला लागला तेव्हा नाईलाजास्तव खाण्याचा कार्यक्रम उरकता घ्यावा लागला. आचारी भारी होता, फक्त भाजी जरा थोडीशी झणझणीत व्हायला पाहीजे होती. बाकी स्वयंपाक उत्तम केला होता. एवढा ताव मारल्यावर सुस्ती आली नाही तरच नवल. डोळे आपोआप मिटायला लागले होते. अर्धा तास नव्याने लावलेल्या लॉन्सवर मस्त डुलकी घेतली. रम्मीचा डाव रंगला होता. कोबडया आणि बदके माझ्या आजुबाजुला फिरत होती. कोंढाळकरांचे फार्म हाऊस आता ख-या अर्थाने फार्म हाऊस वाटायला लागलंय. लॉन्स, नारळाची झाडे, बदके, फायटर कोंबडे कोंबडया ई.
कोंढाळकरांच्या फार्म हाऊसबद्दल बोलायचे झाले तर हा फार्म हाऊस अख्ख्या पानशेत रोडवर प्रसिद्ध आहे. दापेसरवरून आलोय म्हटलं की कोंढाळकरांच्य़ा फार्म हाऊसवर गेले होते ना? असा प्रश्न आपल्यालाच विचारतात. तसेच सिंहगड रोडवरील ब-याच जणांना हा फार्म हाऊस माहीत झालेला आहेच. राहुल आणि धनंजयचे सगळे मित्र कमीतकमी एकदा तरी या फार्म हाऊसवर मुक्कामी येऊन गेलेले आहेत. धायरी वडगाव परीसरात कोंढाळकरांचा फार्म हाऊस माहीत नसलेला एकही व्यक्ती सापडणे तसे अवघडच.

आम्ही सुर्यास्त पहायला सह्याद्रीवर जाणार होतो. राहुलच्या फार्म हाऊसपासुन सह्यकडा साधारण 30 मिनीटांच्या अंतरावर आहे. भर ऊन्हाळ्यातसुद्धा ईथली आजुबाजुची झाडी हिरवीगार आहे. मार्च महीन्यातसुद्धा काही ठिकाणी जमिनीतुन पाणी पाझरत होते. ठिकठिकाणी छोट्या छोट्या झाडांच्या मुळाशी रानडुकरांनी केलेले खड्डे धनंजय आम्हाला दाखवत होता. आम्ही ज्या वाटेने चाललो होतो ती पुढे एका घाटातुन कोकणात उतरणार होती. हिरव्यागार झाडांमुळे तिथे अजिबात उष्णता जाणवत होती. सुर्यप्रकाशामुळे वेगवेगळ्या छटा खुप मस्त दिसत होत्या. एका टेकडीवरच्या झाडांवर सोनेरी छटा तर एकीवर दाट सावली. सह्याद्रीच्या कड्यावर आम्ही पोचलो. तिथे सगळ्यांच्या मोबाइलला रेंज मिळाली आणि सगळ्यांचे डोळे आणि बोटे मोबाइलवर फिरू लागली. मोबाईलवर सगळे हरवुन गेले. या कड्यातुन कोकणात उतरणारी वाट एखाद्या भूलभुलैय्या सारखी आहे. सहज सापडणारी वाट ती नाहीच. कुणी पैज लावत असाल
तर लावा, डबल और नथिंग. शोधायची
तुम्ही कितीही सह्यवेडे असा, सह्याद्री ईथे तुम्हाला मुर्खात काढतो.
मेंदुचा भुगा व्हायची वेळ आली पण तिथुन उतरायची वाट सापडेना. साधारणपणे व्ही आकाराच्या मध्यातुन वाट असायला पाहीजे, पण तिथे कडा होता. त्याच्यापुढे पाऊलवाट दिसत होती पण तिथपर्यंत जायचं कसं? शेवटी मी शोधुन काढलंच. अवघड गणित अचुक सोडवल्यावर जो आनंद मिळतो अगदी तसाच आनंद ती खाली उतरणारी वाट शोधल्यावर मिळाला. त्या कड्यावरून पलीकडे एक सुळका दिसत होता क्लाईंबींग करावे की काय असं सारखं वाटत होतं.

मी आणि धनंजय कोंढाळकर पलीकडे दिसणा-या टोकावर गेलो. एवढी दाट झाडी आहे की त्यात माणसाला चालता येणे तर सोडा, आतमध्ये प्रवेश करणे सुद्धा मुश्कील. आम्ही दोघे पाण्याच्या वाटेने त्या घनदाट जंगलात शिरलो. स्वसंरक्षणासाठी छर्रेची बंदुक बरोबर होती. पाण्याच्या वाटेत जेमतेम पाय ठेवता येईल एवढीच जागा, नाहीतर तिथेही झुडुपांची गर्दी. आमची चाहुल लागल्याने काही अंतरावरून एक रानकोंबडा जीव मुठीत धरून पळुन गेला. त्याच्या पळण्याच्या आवाजाने आमच्या काळजात धस्स झालं. पण तो रानकोंबडा आहे हे कळल्यावर जरा भिती कमी झाली. त्या घनदाट झाडीतुन अक्षरशः वाट तयार करतआम्ही कड्यावर पोहोचलो. झुडुपांमुळे कड्यावर ऊभे रहायला जमत नव्हते. कसेबसे बंदुक धरून एकमेकांचे फोटो काढले. आणि तिथुन माघारी फिरलो. त्या जंगलातुन जाण्याची डेअरींग आम्ही फक्त दोघांनीच केली. तिथली झाडी बघुन आमच्यातल्या ब-याच जणांना वाघाची भिती वाटायला लागली होती. वाघ नामशेष होत चाललेत पण त्यांचा दरारा अजुनही कायम आहे. त्या छोट्याशा जंगलातून फेरफटका मारून झाल्यावर अस्ताला चाललेल्या सुर्याने आमचे लक्ष वेधुन घेतले. लाल, नारंगी आणि पिवळसर छटांनी सुंदर रंगसंगती तयार केली होती. सुर्याला पाठमोरे घेऊन आम्ही शॅडो ईमेजिंग स्टाईलमध्ये बंदुक घेऊन वेगवेगळ्या पोझमध्ये भरपुर फोटो काढले. सुर्य गुडुप झाल्यावर आम्ही तिथुन निघालो. सपासप पावले टाकत संधीप्रकाशाच्या उजेडात अंधार पडायच्या आत आम्ही फार्म हाऊसवर परत आलो. शेकोटी नुकतीच पेटवलेली होती.
No comments:
Post a Comment