Wednesday 31 July 2013

रायलिंग पठारावरुन दिसणारा लिंगाणा

"मोहोरीच्या पठारावरुन दिसणारा लिंगाणा"
       दरवर्षी उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये एकतरी किल्ला सहकुटुंब बघुन यायचा असे ठरवुन ठेवलेले आहे. या मोहीमेअंतर्गत पुण्याजवळील बहुतेक सर्व किल्ले बघुन झालेले आहेत त्यात सिंहगड, राजगड, पुरंदर, शिवनेरी, प्रतापगड, रायगड ई. किल्ले झाले आहेत. २०१३ च्या सुट्टीत कुठल्या किल्ल्यावर चढाई करावी या विचारात पडलो होतो, कारण यावर्षीचा उन्हाळा फारच भयंकर आहे ४१-४२ डिग्री सेल्सिअस तापमानात किल्ला चढणे म्हणजे खुपच कठीण काम. पण कोणता तरी किल्ला पाहायचाच असे ठरवलेले होते. कोणता किल्ला पाहता येईल? याचा विचार करत असताना लिंगाणा समोर दिसणारे रायलिंग पठार डोळयासमोर तरळले. 



लिंगाणाकडे जाताना लागणारी पाबे खिंड. येथुन एकाच वेळी राजगड, तोरणा आणि सिंहगड पाहता येतो.

पाबे खिंडीतुन दिसणारा किल्ले तोरणा.


पाबे खिंडीतुन दिसणारा राजगड.


केळदच्या अलीकडे उजव्या हाताला सिंगापुर मार्गे रायलिंग पठाराकडे.

रायगड पाठमोरा घेऊन उभा असलेला लिंगाणा

फोटो घेण्याची संधी कोण सोडेल?

संपुर्ण रस्ता धुळीने माखलेला, रस्त्यावर एवढी धुळ मी कधीच पाहीलेली नाही. 


काही ठिकाणी धुळीचा थर जवळजवळ ६ ईंचापर्यंत होता.

रानातील फळ, हे कोणते फळ आहे मला माहीत नाही. याच्यावर मधमाश्या घिरटया घालत होत्या त्यावरुन ते मधुर असावे.

रायलिंग पठारावरुन दिसणारा दुर्ग दुर्गेश्वर रायगड

लिंगाणाचे प्रथम दर्शन



















केवळ अविस्मरणीय ! या पावसाळयात एक चक्कर मारायची आहे. हिरवा रंगाने गजबजलेले रायलिंग पठार बघण्याची खुप उत्सुकता आहे.
जय शिवराय !

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...