Posts

असे हेल्मेट द्या मज आणुन

असे हेल्मेट द्या मज आणुन असे हेल्मेट द्या मज आणुन घालीन मी जे स्वेच्छेने असावे ते हलके फुलके मजबुतीला कमी नसावे, असे हेल्मेट द्या मज आणुन असावे त्यात हेडफोन माईक युएसबीला जागा असावी अन एफमचाही जयघोष असावा, असे हेल्मेट द्या मज आणुन दुचाकी असो वा सायकल ट्रेक असो की क्लाईंबिंग सगळीकडे एकच चालावे, असे हेल्मेट द्या मज आणुन डोईवरी सोलर पॅनेल असावे संपता मोबाईलची बॅटरी पॉवर त्यातुन भरुन घ्यावी, असे हेल्मेट द्या मज आणुन अंधाराची भिती न वाटावी मोठी बॅटरी त्यावर असावी रेडीयमची चमचम न्यारी, - © विजय वसवे

कोकणदिवा

Image
कोकणदिवा कोकणदिवा ट्रेक पुन्हा एकदा करण्याचे कारण म्हणजे कोकणदिव्याची ओढ. कोकणदिवा म्हणजे कोकणदिवाच. एखाद्या हॉटेलची चव आवडली तर आपण आवर्जुन पुन्हा त्याच हॉटेलमध्ये जातो. कोकणदिव्याचे अगदी तसेच आहे. तिथे एकदा जाऊन आल्यावर त्याठिकाणी पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. गर्द झाडीने वेढलेला कोकणदिवा, दाट जंगलातुन जाणारी वाट, थोडीच पण फणा काढुन अंगावर आलेली चढण, एैसपैस कोरीव गुहा, काळनदीचा पसारा आणि आठही बाजुंनी दिसणारे सह्याद्रीचे विलोभनीय रूप. त्याच्या माथ्यावरून होणारे स्वराज्याच्या राजधानीचे दर्शन तर तसेच डोळ्यात साठवुन घ्यावेसे वाटते. कोणाला आवडणार नाही? कोकणदिव्यावरून रायगड खुप सुंदर दिसतो हे ऐकल्यावर राजे स्वतः रायगड पाहण्यासाठी कोकणदिव्यावर येऊन गेले होते. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनाही येथे येण्याचा मोह आवरला नाही तर आपण कोण? त्याकाळी रायगडाला जागता पहारा देण्यासाठी कोकणदिवा डोळ्यात तेल घालुन उभा राहत असे. गर्द झाडीने वेढलेला कोकणदिवा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही कोकणदिव्याला जायचे ठरवले. बरोबर घ्यावयाच्या सर्व वस्तुंची यादी मित्रांना दिली...

सलग ६०० कि.मी. सायकलिंग

Image
सलग ६०० किमी सायकलिंग....  Pune Randonneurs : Date: 9th January, 2016 Start Time: 06:00 Starting Point Pune University Route Map: Deccan Naadkhula 600 km Facebook: Check out this event on Facebook Event Details on AIR site: 600 BRM 9th Jan 2016 माझे सुपर रँदोनिअर होण्याचे स्वप्न मला पुर्ण करायचे आहे आणि त्यासाठी मला ४० तासात ६०० किमी चालवणे आवश्यक आहे. या ४० तासांत सायकल चालवणे, नाष्टा, जेवण, विश्रांती, झोप आणि पंक्चर वगैरे सायकलची कामे निघाली तर तीसुद्धा या ४० तासातच उरकायची आणि ६०० किमी अंतर पार करायचे. सलग ४० तास सायकल चालवण्याचे ओझे पेलताना पंक्चर आणि ब्रेकडाउनची तलवार सतत डोक्यावर टांगलेली असते. महागडे टायर्स आणि महागड्या सायकल्स वापरण्याचे कारण म्हणजे बीआरएममध्ये ब्रेकडाउन आणि पंक्चरच्या धोक्याचे प्रमाण खुप कमी करणे होय. ९ जानेवारीला पुणे रँदोनियर्सचे ६०० किमी चे ब्रेवेट होते. नविन वर्षातील हे पहीलेच ब्रेवेट. ज्या मार्गावर ४०० किमी सायकल चालवली त्याच मार्गावर थोडे अंतर वाढवून ६०० किमी सायकल चालवायची होती. ४०० च्या बीआरएममध्ये माझी एवढी वाट लाग...