सिंहगड राजगड तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन स्फूर्ति आणि प्रेरणा सिंहगड राजगड तोरणा (SRT Ultra marathon 53km) सिंहगड राजगड तोरणा (SRT Ultra marathon 53km) भाग १ जेव्हा या मॅरेथॉनचे नाव ऐकले होते तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि मनातल्या मनात पक्के ठरवले होते की आयुष्यात एकदातरी हि तीन गडांना जोडणारी मॅरेथॉन करायचीच. सिंहगड, राजगड आणि तोरणा हे तिन्ही किल्ले मला मनापासुन आवडतात, त्यात राजगड म्हणजे माझा जीव की प्राण आणि सर्वात जास्त जवळीक कोणाशी असेल तर ती म्हणजे सिंहगडाशी. जवळीक म्हणजे मला कळायला लागल्या लागल्या सर्वप्रथम ज्ञात झालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सिंहगड. चोहोबाजुंनी कातळ कडयांनी वेढलेला अभेद्य सिंहगड. आमच्या घराच्या अंगणात ऊभे राहीले की संपुर्ण पुर्व दिशा झाकाळुन टाकणारा सिंहगड समोर दिसतो. आणि राजगडाबद्दल काय बोलावे.. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीतील २५ वर्षे राजगडावर घालवली. अनेकदा मृत्युवर भवानी तलवार उगारुन महाराज झेपावलेत ते याच गडावरुन. आणि तोरणा म्हणजे तर स्वराज्याचे पहीले तोरण आणि गरुडाचं घरटं. एका द...
Comments
Post a Comment