Posts

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

Image
शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख - 16 एप्रिल, 2023 रनिंगमध्ये मॅरेथॉनची वेळ सुधारण्याच्या नादात माझे सायकल चालवणे मागे पडले होते हे मला मान्य करावेच लागेल. गेली दोन वर्षे झाले पन्नास हजार किमी सायकलिंगचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एक हजार पेक्षाही कमी अंतराची आवश्यकता असताना माझ्याकडुन तोही पार झालेला नाही. जुन महीन्यातील पुणे पंढरपुर सायकलवारी झाल्यानंतर सायकल स्वच्छ करुन मस्तपैकी टांगुन ठेवुन दिली होती. यावर्षीची टाटा अल्ट्रा मॅरेथॉन पुर्ण केल्यानंतर पायांना थोडी विश्रांती द्यावी असे मी ठरवले होते. याच दरम्यान अंजलीने मला "कुंभार्लीचा राजा" या सायकल शर्यतीविषयी माहीती दिली. सह्याद्रीच्या घाटात सायकल शर्यत आयोजित केली जात आहे हे ऐकुनच मला फार आनंद झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता मी या शर्यतीसाठी नाव नोंदवले. कोकणातुन वर यायचे असेल तर सह्याद्रीत अनेक घाटरस्ते आहेत. त्यापैकी बरेच मी सायकलवर चढवलेले आहेत. मराठा रमतो तो सह्याद्रीतच. भोरघाट, ताम्हीणी घाट, वरंधा घाट, आंब...

मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २)

Image
मुंबई मॅरेथॉन 2023 (भाग २) रेल्वे प्रवास, खाणे आणि निवांत झोपणे फक्त एवढेच काम असल्यामुळे शरीरामध्ये दैनंदिन जीवनात जाणवणारा थकवा औषधालाही जाणवत नव्हता. शरीर एकदम ताजेतवाने होते. पहाटे तीनचा अलार्म असुनही मला अलार्मच्या अगोदर दोन मिनिटे जाग आली. एवढे माझे मन, बुद्धी आणि शरीर मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आतुर झालेले होते. मन थोडे साशंक वाटत होते. यावेळेस सब-फोर होईल की नाही? हा यक्षप्रश्न माझ्यासमोर ऊभा होता. शंकांचे काहुर, अनिश्चिततेचे सावट आणि सब-फोरचा निर्धार सोबत घेऊन मी हॉटेल सोडले. हॉटेल शबाना गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आणि रीगल सिनेमाला लागुनच होते. मी बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा सगळीकडे रनर्सच रनर्स दृष्टीस पडत होते. मी पण मॅरेथॉन धावणार्यांच्या लोंढयात सामील झालो. थोडे मंदगतीने धावत हृदयाला गतीमान करण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात "फेस स्कॅनरने" चेहर्याची ओळख पटल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. सर्व भारतातुन बरेचसे धावपटु ही मॅरेथॉन धावण्यासाठी येथे आलेले होते. काही निष्णात, काही नवखे, काही हौशी तर काही बक्षिस जिंकण्याच्या लालसेने आलेले होते.  ...

मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)

Image
मुंबई मॅरेथॉन 2023 (पूर्वतयारी)   ग्रंथांमध्ये जशी गीता, नद्यांमध्ये जशी गंगा, गडांमध्ये जसा दुर्गदुर्गेश्वर रायगड, देवांमध्ये जसा इंद्र, पक्ष्यांमध्ये जसा गरूड, पर्वतांमध्ये जसा मेरू पर्वत, मण्यांमध्ये जसा कौस्तुभ मणी, वैष्णवांमध्ये जसा शंभू आणि अप्सरांमध्ये जशी ऊर्वशी तशी सर्व मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉन. पळण्याचे वेड लावणारी मुंबई मॅरेथॉन. हर दिल मुंबई म्हणजे मुंबई मॅरेथॉन. रनिंगची पंढरी म्हणजे मुंबई मॅरेथॉन. अशा या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्याशिवाय स्वत:ला रनर म्हणुन घेणार्या कोणत्याही व्यक्तीला सदगती प्राप्त होणे शक्य नाही. याचसाठी केला होता अट्टहास असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी मुंबई मॅरेथॉन पुनरागमन करणार होती आणि मी मात्र रनिंगपासुन फार दुर गेलेलो होतो. 17 सप्टेंबरला आमचा बहुचर्चित दुधसागर ट्रेक संपन्न झाला आणि मी 2022 सालातील नियोजीत सहली आणि ईच्छेनुसार आखलेल्या सर्व ट्रेक्समधुन मोकळा झालो. याच कालावधीत बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनची नावनोंदणी सुरु होणार अशी चर्चा ऐकायला मिळाली. यामुळे मुंबई मॅरेथॉनच्या चर्चेला उ...

वाजवा कि हॉर्न (मलेशिया)

Image
"Horn Please" मलेशियामध्ये बुधवारी सकाळी सायकलचा सराव करण्यासाठी बाहेर पडलो. नवखे रस्ते, नवखा परीसर आणि सारे लोकही नवखे होते. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आलेले या नजरेतुनच आमच्याकडे सर्वजण पाहत होते. प्रसाद, नंदकुमार, पुष्कराज आणि मी आयर्नमॅनच्या रूटवर सायकल चालवायला निघालो. वाहतुक फारशी नव्हती. लोकांची गर्दीही जाणवत नव्हती. गाड्या चालवणारे काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळत होते. दाबादाबी नाही की पुढे जाण्याची कोणाला घाई नाही. सर्व काही शिस्तीत चालु होते. प्रत्येकजण समोरच्याला अगोदर जाण्यास प्राधान्य देत होता. पहले आप.. पहले आप सारखे. पावसाचे थेंब यायला लागल्यामुळे मोबाईल हॉटेल रूमवरच ठेवुन दिला त्यामुळे सायकल रूटचे फोटो आणि व्हिडिओ काढता आले नाहीत. रस्त्यावर गर्दी नाही, राँग साईडने येणारे कोणी नाही हे पाहुन मला खुप चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले होते.  साधा हॉर्न वाजवणारे सुद्धा कोणी नव्हते. हॉर्नचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुर व्हायला लागले होते. काय करावे मला सुचत नव्हते. कम्बख्त कोई तो हॉर्न बजाओ रे... असं मी म्हटलं सुद्धा पण माझी भाषा काही त्यांना कळाली नाही. शेव...

केदारनाथ यात्रा

Image
केदारनाथ यात्रा     "हम भी एक दिन केदारनाथ आयेंगे महादेव, सुना है वहां स्वर्ग से हवा आती है" 2018 साली आलेल्या केदारनाथ या सिनेमातील या संवादाने मनाला खुप भुरळ घातलेली होती. त्यामुळे कधी एकदा केदारनाथ बाबाचे दर्शन घ्यायला जातोय असे झालेले होते. मी नेमका त्यावेळी आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीत व्यस्त होतो. व्यस्त म्हणजे असा व्यस्त कि ज्याचे नाव तेच, "नो हिलिंग नो डुलिंग". अशा परीस्थितीमुळे फिरण्यासाठी किंवा तिर्थयात्रेसाठी बाहेर पडण्याचा विचारच करू शकत नव्हतो. आयर्नमॅनचा किताब मिळवण्यात दोन-तीन वर्ष गेली आणि त्यानंतर लगेच कोविड-19 ची महामारी आली. या महामारीमुळे उत्तराखंड सरकारने सलग दोन वर्षे कोणालाच केदारबाबाच्या दर्शनासाठी सोडले नाही. माझ्या व्यस्तपणामुळे सौ.ला सोबत घेऊन शेवटचे कुठे फिरायला गेलो होतो ते आठवतही नव्हते. कूठेच फिरायला जाता आलेले नव्हते. त्यामूळे "नवरा फिरायला नेत नाही" या जागतिक समस्येने मला ग्रासले होते. आणि हि समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर तिचे विस्फोटात रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. माझी बायको यशोदा टूर्सकडुन माझ...

हरीमुखे म्हणा...

Image
पुण्याची गणना कोण करी? "हरी मुखे म्हणा हरी मुखे...पुण्याची गणना कोण करी" मुखात हरीचे नाव आल्यावर जे पुण्य लाभते त्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. ऐकायला किती साधे वाटते. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. काया, वाचा, मन आणि इंद्रियांच्या संयोगाने आपण ईतर जीवांना जो त्रास किंवा पीडा देतो ते म्हणजे पाप. एका क्षुद्र जीवाला त्रास दिल्याने पाप लागण्याचे काय कारण असावे बरे? कारण "हृदयेषु सन्निविष्टो". तुम्ही त्या जीवाला नाही तर त्याच्या हृदयात वास करणार्या प्रत्यक्ष भगवंताला त्रास देत असता. तुम्ही म्हणाल "कोण भगवंत?" तेच भगवंत "अहं सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते" हे अर्जुनाला सांगणारे. सर्व गोष्टींचा मालक मी आहे आणि माझ्यापासुनच सर्वकाही येते. जे जे दृश्य आणि अदृश्य आहे ते ते सर्व (सर्वस्य). हि पृथ्वी माझी, हा चंद्र माझा, हा सुर्य माझा, हे समुद्र माझे, ग्रह तारे माझे, एवढेच काय तु जो श्वास घेत आहेस तो वाराही माझाच आहे. ढगांतुन बरसणारा पाऊसही माझाच आहे. सर्वकाही भगवंतांचेच आहे. म्हणुन तुम्ही जेव्हा एखाद्या जीवाला पीडा देत...

आशिया कप अंतिम सामना २०२२

अशिया कप अंतिम सामना २०२२!  अपेक्षित होते कि आपला भारत आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळेल परंतु अपेक्षा या भंग होण्यासाठीच असतात हेही तेवढेच खरे आहे. क्रिकेटमुळे भारतीय बोर्डाकडे अमाप संपत्ती आली पण त्या श्रीमंतीला यशाने बर्याचदा हुलकावणीच दिलेली आहे. नाही म्हणायला आपला एक पंच अंतिम सामन्यात दिसत होता हेही नसे थोडके आणि रवि शास्त्रीचे समालोचन ऐकायला मिळणार होते. रविच्या समालोचनाविषयी काय बोलावे. खरं सांगायचे तर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकाची भुमिका निभावत असताना मला त्याच्या समालोचनाची खुप आठवण येत असे. रविवारच्या दिवशी व्हिस्की सोबत तंदुरी चिकन मिळाल्यावर जी मजा येते तीच मजा एखाद्या रंगतदार सामन्यात रवी शास्त्रीचे समालोचन ऐकताना येते. सध्या हिंदी समालोचन सुद्धा बहरत चाललेले आहे पण मला ते कमी कपडे घालुन लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करणार्या एखाद्या नुतन अभिनेत्रीसारखे वाटते म्हणुन मी त्याच्या वाटेला जात नाही. हिंदी समालोचन मला झेपत नाही. विशेष म्हणजे काल कोणतीही तिथी आडवी न आल्यामुळे व्हिस्कीचा एकेक थेंब घशाखाली उतरवत अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद घेता आला. अर्थातच मी श्रीलंकेच्या बा...