Tuesday, 10 July 2012

माझी सुरक्षा कविता !


लोखंडाशी खेळताना तुझे हात लोखंडासारखे झाले असतीलही, पण तरीही त्यांना लोखंडापासुन जपायला हवं.. हॅंडग्लोव्हज चे कवच तुझ्या हातांना देत जा, आणि "ईअर प्लग" च्या भिंती कानांना.... आता पेटवु सारे रान म्हणुन वा-यासारखा निघशील, पण निघताना "सेफ़्टी शुज" पहीला घाल, वा-याशी झुंज म्हणजे डोळ्यांची अग्निपरीक्षा, एका सेफ़्टी गॉगलने ती सहज पास होशील.. उत्तुंग मी अथांग मी म्हणत उंचावर जाशील, पण "वायर रोप" बांधलाय ना याची खात्री कर जर चुकुन तुझी अथांगता कमी पडली तर तो वायर रोप तुझा भार समर्थपणे पेलेल.... आपण म्हणजे कर्ण नव्हे.. कवचकुंडले असायला, म्हणुन काय झालं? पण आपण एवढे दीनही नाही ... सुरक्षा साधनसामुग्रीचा खच पडलाय आपल्या दिमतीला, तु फ़क्त आवाज दे, काय हवंय तुझ्या सुरक्षेला??? (ईंडस्ट्रीजमधे काम करणा-या माझ्या सर्व मित्रांसाठी) 4 ते 10 मार्चच्या सेफ़्टी विकच्या निमित्ताने... © Copyright Vijay Vasve

No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...