Posts

मी Randonneur झालो.

Image
मी Randonneur झालो... हे वाचल्या वाचल्या तुम्हाला प्रश्न पडेल की ही Randonneur (रान्दोनिअर) काय भानगड आहे?ती भानगड Brevet Randonneurs Mondiaux (BRM) अशी आहे. आणि ही BRM ची भानगड AUDAX CLUB PARISIEN FRANCE देशाशी संबंधीत आहे. सायकलींग आणि फ्रान्स देश म्हटलं की आपल्या समोर येतं ते Tour de France. आपल्या ईथे जशी कुस्तीची परंपरा तशी तिथली सायकलिंगची.  AUDAX INDIA RANDONNEURS (AIR) हा भारतातील क्लब CLUB OF PARISIEN बरोबर संलग्न आहे. भारतात आयोजित होणा-या सर्व BRM ची माहीती फ्रान्सपर्यंत पोचवली जाते. भारतातील प्रमुख शहरांमधील BRM आयोजित करणारे सर्व क्लब AIR मध्ये संलग्न आहेत. आणि या सर्व गोष्टी होण्यास कारणीभुत आहेत दिव्या ताटे. भारतातील BRM दिव्या ताटेंशिवाय होऊच शकत नाही. जे काही मी ऐकतोय आणि वाचतोय त्यानुसार दिव्या ताटे या BRM साठी भारतातील सर्वेसर्वा आहेत. पुण्यामधील सर्व BRM Pune Randonneurs आयोजित करतात. अर्थातच या क्लबची सर्व देखभाल दिव्या ताटे करत आहेत. वेळापत्रक बनवण्यापासुन ते मार्ग ठरवण्यापर्यंत सर्वकाही त्याच करत होत्या, हल्ली त्यांच्या मदतीला ईतर सायकलिस्ट धावुन यायला ल...

प्रबळगड आणि कलावंतीनदुर्ग

Image
"प्रबळगड आणि कलावंतीन"           28 सप्टें ला एकदाचा कलावंतीनदुर्ग करण्याचा योग आला. याच दिवशी लाईफ सायकलची पांचगणी १०० कि. मी. ची सायकल शर्यतसुद्धा होती, पुणे व्हेंचर्सचा हरिश्चंद्रगड ट्रेकही याच दिवशी होता. कुठे जावं काही कळत नव्हतं. १०० कि. मी. ची सायकल शर्यत मला जिंकणे शक्य नव्हते त्यामुळे नुसते श्रम एव ही केवलम करण्यात काहीच अर्थ नव्हता. हरिश्चंद्रगडला आदल्या दिवशी मुक्कामी जावयाचे होते त्यापेक्षा FONA चा प्रबळगड ट्रेक सकाळी निघुन संध्याकाळी परत येण्याचा, मस्त वाटला. लगेच मनोज राणेंच्या अकाऊंटवर ५०० रूपये हस्तांतरित केले आणि विंडो सीट बुक करून ठेवली. :D            बसप्रवास निगडीपासुन सुरू होणार होता. धायरी ते निगडी कसे पोचावे? या विचारात असतानाच राणेंच्या एका ई-मेल ने एक भन्नाट कल्पना सुचवली होती. शिवाजीनगर ते तळेगांव स्टेशन लोकलने यायचे आणि तळेगांव स्टेशनला बस पकडायची. व्वा भारी एकदम, याला म्हणतात thinking out of box. मग यात माझं सायकलप्रेम ऊतु गेलं नाही तर नवलच. शिवाजीनगर पर्यंत मी सायकल घेऊन गेलो, स्टँडला सायकल लावली. ...

माझी सायकल

"माझी सायकल" साधारण एक वर्षापुर्वी राहुल सारखा म्हणायचा आपण सायकल चालवायला जात जाऊ. मी बोपदेव घाटात जाऊन आलो एकटा, कँपात गेलो होतो मागच्या रविवारी. त्याचे सायकल चालवणे हळ...

दापेसर ते धायरी सायकलवर परतीचा प्रवास

धायरी ते दापेसर अंतर सायकलवर पार करणारे सायकलपटु; धनंजय कोंढाळकर,  वाघमारे, दत्तात्रेय पवार, राहुल कोंढाळकर,   सचिन ठाकरे, विजय वसवे, मिलींद पोकळे, संतोष चाकणकर आणि सुनिल धाडवे.       धायरी ते दापेसर   सायकल चालवत जरी आम्ही नऊच जण आलेलो असलो तरी बाकीची मंडळीं राहुलच्या फार्म हाऊसवर आमच्या अगोदरच पोहोचलेली होती. सेवेसाठी असलेली जिप्सी त्यांनी प्रवासासाठी उपयोगात आणली होती. अर्ध्यात सायकल चालवायचे सोडुनसुद्धा बरेच जण दमल्यासारखे वाटत होते. सगळया बाज हाऊसफुल होत्या. भर उन्हात सायकल चालवणे खुप तापदायक ठरते विशेषत: जेव्हा तुमच्याकडची रसद आणि पाणी संपलेले असते.       सायकलींग करताना रसद म्हणुन कॅडबरी अतिउत्तम, सायकलिंगला जाताना छोटया साईजच्या फाईव्ह स्टार किंवा डेअरी मिल्क खुप उपयोगी ठरतात, त्यानंतर पार्ले-जी बिस्कीटस (सध्या + नावाने यांची बिस्कीटे मिळतात ती खुप उपयोगी आहेत-धनंजय कोंढाळकर), चॉकलेटस आणि तुम्ही जर खुप वेळ सायकल चालवली तर तुम्ही काहीही पचवु शकता असा माझा अनुभव आहे. पाणी तर बरोबर असायलाच पाहीजे, पण पाणी पिताना एकदम घटघट...

धायरी ते दापेसर ५८ कि.मी. चा सायकलप्रवास

Image
"धायरी ते दापेसर सायकल मोहीम"       धायरी ते दापेसर सायकल मोहीमेची जय्यत तयारी आठवडाभर अगोदरपासुनच सुरु होती. परफेक्ट सायकल ग्रुपसाठी विशेष टिशर्ट डिजाईन करुन घेतले होते हा त्याचाच एक भाग. टि-शर्टच्या आकारापासुन ते त्याच्या रंगसंगतीपर्यंत सर्व काही पारखुन निरखुन ठरवलेले होते. आणि यासाठी राहुल कोंढाळकरांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा होता. आदल्या दिवशी संध्याकाळी नऊ वाजता सगळया सायकलपटुंना परफेक्ट जिमजवळ बोलावुन त्यांच्या त्यांच्या साईजचे टि-शर्ट आणि टोपी प्रत्येकाला देण्यात आली. सगळेजण आवर्जुन आले होते. सकाळी सहा वाजता चव्हाण बागेत जमायचे ठरवुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. नविन टि-शर्ट पाहुन सगळे उत्साहीत झालेले दिसत होते. परफेक्टचे सायकलपटु आता एकाच रंगात दिसणार होते.        मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वेळेच्या अगोदरच चव्हाण बागेत पोहोचलो. सकाळी ५ वाजुन ५० मिनिटे झालेली होती. ०५:५८ ला राहुलचा फोन आला, "आवरलं का?", "मी चव्हाण बागेत येऊन थांबलोय" हे माझे उत्तर ऐकुन त्याला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. चव्हाण बागेत ६ च्या अगोदर येणारा मी एकमे...