Posts

माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन २०२१

Image
स्पर्धा - माथेरान अल्ट्रा मॅरेथॉन   अंतर - ५० किमी तारीख - १० ऑक्टोबर, २०२१ आयोजक - रनबडीज ठिकाण - माथेरान, थंड हवेचे ठिकाण प्रवेश फि - ३०००/- (फिनिशर मेडल, टि-शर्ट ई) फोटो - वेलोस्कोपच्या छायाचित्रकारांनी धावताना काढलेले फोटो हवे असतील तर ३५५/- रुपये आकारले जातात. मुफ्त फोटो - चेतन घुसानी हवामान - थंड अपेक्षित होते परंतु ऑक्टोबरची उष्णता ईथेही जाणवली. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे धावण्याच्या मार्गावर चिखल झालेला होता आणि वातावरणात उकाडा जाणवत होता. थंड हवेच्या ठिकाणी थंड हवा औषधालाही मिळाली नाही (धावताना).  प्रवास - पुणे ते खोपोली जुन्या महामार्गाने गेल्यास उत्तम. पुणे ते माथेरान थेट प्रवास करण्याची कोणतीही सार्वजनिक सुविधा नसल्यामुळे स्वत:चे वाहन घेऊन जाणे अपरीहार्य. माथेरानमध्ये स्वयंचलीत वाहनांना प्रवेशबंदी आहे त्यामुळे माथेरानपासुन अडीच किमी अंतरावर वाहन लावावे लागते. त्यासाठी मोठा वाहनतळ आहे तिथे भरभक्कम दर आकारुन वाहन लावुन घेतात (दोन दिवसाचे १२० रुपये). माथेरानमध्ये प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश फि घेतली जाते. मास्क न घातल्यास ५०० रुपये द...

दिवस पहीला, मनाली लेह खार्दुंगला सायकल मोहीम

Image
सायकल मोहीम - मनाली लेह खारदुंग ला सायकलिंग (एमटीबी) आयोजक - युथ हॉस्टेल असोसिअशन ऑफ इंडीया कालावधी - १४ दिवस (१० जुलै ते २३ जुलै, २०२१) शुल्क - २८००० रुपये (सर्व सुविधांसहीत) सायकल - या प्रवासात चालवण्यासाठी लागणारी एमटीबी सायकल हि YHAI तर्फे दिली जाते. मध्यम स्वरुपातील नावाजलेल्या ब्रॅंडची उत्तम सायकल सर्व सहभागी व्यक्तींना त्यांच्या आवडीनुसार दिली जाते. मेडीकल सुविधा - सोबत डॉक्टर, अ‍ॅम्बुलन्स, ऑक्सीजन सिलेंडर, प्राथमिक उपचार साहीत्य सायकलिंगला लागणारे साहीत्य - हेल्मेट, ग्लोव्ज, एल्बो आणि नी गार्डस आणि रिफ्लेक्टीव बेल्ट ई. साहीत्य पुरवले जाते. राहण्याची व्यवस्था - तंबुचे टॉयलेट (सार्वजनिक), ताडपत्री तंबु (एका तंबुत ८ व्यक्ती) तसेच झोपण्यासाठी स्लिपींग बॅग आणि चादर हे साहीत्य पुरवले जाते. जेवणाची व्यवस्था - अमर्यादित शाकाहारी जेवणाची व्यवस्था केलेली असते, जैन प्रकारचे जेवण सुद्धा बनवले जाते. चहा, सुप, वेलकम ड्रिंक, पिण्यासाठी गरम पाणी इ. तसेच १५९०० फुटांवर गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच... जेवणाचे साहीत्य - ताट, वाटी, चमचा आणि मग (मोठा कप) हे स्वत: न्यावे लागते आणि जेवण ...

दिवस दुसरा, मढी ते सिस्सु

Image
दिवस दुसरा, मढी ते सिस्सु दिवस - २ मढी ते सिस्सु अंतर - ५० किमी चढ - ७६२ मी (गारमिननुसार) श्रेणी - मध्यम कठिण हवामान - रोहतांग पास पर्यंत अतिशय थंड, कमी-अधिक पाऊस, त्यानंतर आल्हाददायक आणि रम्य वातावरण      जेवल्यानंतर हात धुण्यासाठी गेलो तेव्हा मी दहा मिनिटे त्या पाण्याकडे बघत बसलो होतो. थंडीच्या दिवसात आंघोळीला गेल्यावर आंघोळ करण्याऐवजी जसे आपण बादलीतील पाण्याकडेच नुसते बघत राहतो तसे. आता कसा त्या पाण्यात हात घालु? नंतर कळले कि ते पाणी गरम करुन ठेवलेले आहे. हाहाहा.. हात धुण्याची हि अवस्था तर आंघोळीचा विचारही मनात येणे शक्य नव्हते. एखादयाने बंदुक दाखवुन जरी आंघोळ करायला लावली असती तरीही मी आंघोळ केली नसती. गोळी घाल बाबा! पण मी आंघोळ करणार नाही असे मी निक्षुन सांगितले असते. या अशा असह्य थंडीमुळे कधी एकदा मढी सोडतोय असे झाले होते. पहील्याच दिवशी एवढी वाताहत झाली होती कि आता पुढे काय वाढुन ठेवलेले असेल या चिंतेने ग्रासुन गेलो होतो. "देवाक काळजी रे...माझ्या..." या गाण्याच्या ओळी आपसुकपणे माझ्या ओठांवर येत होत्या. कुठुन बुद्धी सुचली आणि या राईडला...

कुंडलिका रिवर अल्ट्रा मॅरेथॉन

Image
कुंडलिका रिवर अल्ट्रा मॅरेथॉन  स्पर्धेचे अंतर - ५१ किमी (अल्ट्रा मॅरेथॉन)  स्थळ - स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका, कोलाड आयोजक - रनबडीज  स्पर्धेची वेळ - हि स्पर्धा ग्रामीण भागात आयोजित केली जाते. येथील रस्त्यावर विजेचे दिवे नसल्यामुळे सुर्योदय झाल्याशिवाय स्पर्धेला सुरुवात होत नाही. सकाळी ६:०० ते दुपारी १:०० यावेळेत ५१ किमी अंतर पळायचे असते. सुर्यनारायण तळपायला लागल्यावर पळणे असह्य होऊन जाते. सकाळी नऊ वाजता ३६ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. अंतराची विभागणी - ५१ किमी अंतर चार फे-यांमध्ये विभागलेले आहे. पहीली फेरी २१ किमी अंतराची नंतर १० किमीच्या तीन फे-या माराव्या लागतात. ५ किमी जायचे आणि ५ किमी यायचे असे दहा किमी. पाच किमीमध्ये १ किमीचा तीव्र उतार, १ किमी तीव्र चढ आणि बाकीचे अंतर कमी जास्त चढ उतारांनी भरलेले आहे जे नक्कीच सुसह्य वाटत नाहीत. या चढांवर नुसते चालणे सुद्धा अशक्यप्राय वाटत होते.  स्पर्धेचे हवामान - अतिशय दमट हवामान, असह्य उकाडा, तीव्र चढ आणि तीव्र उतार यापैकी कोणताही एक घटक तुम्हाला स्पर्धेतुन बाहेर घालवु शकतो. कधी कधी ढग सावली घेऊन...

ग्रीन जर्सीचा सम्राट पीटर सागान.

Image
ग्रीन जर्सीचा सम्राट! पीटर सागान.   टूर द फ्रान्स म्हणजे सायकलिंग विश्वातील पंढरी. जसा पंढरीत गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही तसा टूर द फ्रान्समध्ये सायकल चालवल्याशिवाय कोणत्याही सायकलपटूचा जन्म सार्थकी लागत नाही. यावर्षी तर काही सायकलपटूंनी ऑलिम्पिक ऐवजी या ग्रँड टूरला प्रथम पसंती दिली आहे यावरून तुमच्या लक्षात येईल हे काय प्रकरण आहे ते. टूर द फ्रान्स पाहुन माझे जीवश्च कंठश्च म्हणतात, भावा, तु कधी जाणार टूर दि फ्रान्सला? मला माहीतीये माझी लायकी काय आहे ते, पण माझ्या मित्रांच्या निरागस प्रेमाला या जगात तोड नाही. मित्रप्रेम म्हणतात ते हेच. तर त्या टूर द फ्रान्समध्ये वेगवेगळ्या रंगांच्या जर्सी जिंकावयाच्या असतात. त्यातलीच एक बहुप्रतिष्ठीत ग्रीन जर्सी. मी जेव्हापासुन सायकल चालवायला सुरूवात केली तेव्हापासुन टूर द फ्रान्स न चूकता बघत आहे. आणि दरवर्षी हा पठ्ठ्या पीटर सागान ती ग्रीन जर्सी जिंकत आलेला आहे. सात वेळा ग्रीन जर्सी जिंकण्याचे जागतिक रेकॉर्ड याच्याच नावावर आहे. न भूतो न भविष्यति! पीटर सागान...नाम तो सुना ही होगा.. आपल्या क्रिकेटमध्ये जैसा सचिन तेंडुलकर तैसा सायकलिंगमध...

माझे एवरेस्टींग

Image
 माझे एवरेस्टींग  माऊंट एवरेस्टची समुद्रसपाटीपासुनची ऊंची जवळजवळ 8848(+1) मीटर आहे. कोणत्याही ठिकाणी सायकल चालवुन एवरेस्ट एवढी उंची गाठणे म्हणजेच एवरेस्टींग होय. एवरेस्टींग म्हणजे एवरेस्टवर जाणे नव्हे. कोणताही एखादा चढ निवडावा, छोटा असो वा मोठा, तो बर्याच वेळा वर-खाली केल्यानंतर एवरेस्ट एवढी उंची आली कि एवरेस्टींग झाले असे समजावे. या उंचीला एवरेस्टींगचा दर्जा मिळण्यासाठी या राईडची लिंक (फक्त स्ट्रावा) एवरेस्टींग टिमला पाठवावी लागते. त्यांची संमती मिळाली कि आपले नाव एवरेस्टींगच्या वेबसाईटवर "हॉल ऑफ फेम" मध्ये कायमस्वरूपी नोंदवले जाते. एवरेस्टींग हाफ (4424मी) आणि फूल (8848मी) असे दोन प्रकारे करता येते. एवरेस्टींगचे वैशिष्टय म्हणजे यासाठी कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नसते (सध्यातरी). कसलीही प्रवेश फि नाही, विमानप्रवास नाही, ना कसला हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च त्यामुळे यासाठी पैशाची आवश्यकता नसून फक्त कतृत्वाची गरज आहे. ज्या सायकलपटूंना आर्थिक परीस्थिती अभावी आपले कर्तब दाखवता येत नाही त्यांच्यासाठी एवरेस्टींग हि सुवर्णसंधी आहे. नेहमी प्रवेश फि आणि ईतर खर्चाबद्दल तक्र...

पुणे गोवा पुणे सायकल मोहीम

Image
  पुणे गोवा पुणे सायकल मोहीम पुणे गोवा पुणे सायकल मोहीम यावर्षी दिवाळी झाली की गोवा सायकल मोहीम करायचीच असे मनोमन ठरवलेले होते. कोरोना महामारीच्या कचाटयातुन कशीबशी हळूहळू सूटका होत चाललेली होती. त्यामुळे प्रवासासाठी सूट मिळालेली होती, हॉटेल्स वगैरे व्यवस्थित सुरु झालेली होती. माझ्यासाठी एवढे पुरेसे होते. सायकल चालवताना रस्त्यात तहान लागल्यावर पाणी आणि भूक लागल्यावर अन्न मिळाले कि सायकलचा प्रवास सुखकर होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा गोव्याला जाणार होतो आणि तेही सायकलवर. आणि परतीचा प्रवास सुद्धा सायकलवरच करणार होतो. तेवढंच थोडं जगावेगळं. मला जगावेगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि सगळं जग जे करते त्यापासुन मी लांब राहतो. कदाचित याच कारणामुळे मी एवढे दिवस गोव्याला गेलेलो नाही. कधीतरी व्हिस्की पितो पण बीचवरील दृश्य बघण्यात मला कसलाही रस नाही. वातानुकूलित वाहनामध्ये प्रवास करण्याची मला अ‍ॅलर्जी आहे. एसी लावलेल्या कारमध्ये प्रवास केला कि मी आजारी पडलोच म्हणून समजा, असे ब-याचदा झालेले आहे. सायकल चालवताना मिळणारी स्वच्छ, मोकळी आणि ऑक्सीजनने परीपूर्ण असलेली हवा मला फार आवडते. बरेचजण गोव्याला साय...